Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • मांजा दोऱ्यामुळे ७ वर्षाच्या मुलाचा कापला गळा, दुचाकीवरून जाताना घडली घटना
Top News

मांजा दोऱ्यामुळे ७ वर्षाच्या मुलाचा कापला गळा, दुचाकीवरून जाताना घडली घटना

Child Injured by Manja
86

Manja String Accident Child Injured : धुळे जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. मोटरसायकलवरून प्रवास करत असताना  गळा मांजामुळे एका सात वर्षाच्या मुलाचा गळा कापल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिरपूर शहरातील करवंद रोड परिसरात ही घटना घडली असून, पतंगाच्या मांजामुळे निष्पाप बालक जखमी झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेत अवघ्या ७ वर्षाचा चिमुकला निष्पाप राज आनंदसिंग पिंपळे हा गंभीर जखमी झाला आहे. राज हा धुळे जिल्ह्यातील वारूळ गावाचा रहिवासी आहे. 

हेही वाचा – बडतर्फ पूजा खेडकरचे हातपाय बांधून डांबून ठेवत चोरी

राज हा आपल्या काका आणि काकू यांच्यासोबत मोटरसायकलवरून प्रवास करत होता. मोटरसायकलच्या पुढील बाजूस बसलेल्या राजच्या गळ्याला अचानक रस्त्यावर ताणलेल्या धारदार मांजाचा फास लागला आणि त्याचा गळा गंभीररीत्या जखमी झाला. घटनेनंतर तातडीने जखमी राजला उपचारासाठी शासकीय हिरा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असून, रात्री उशिरा त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या तो डॉक्टरांच्या कडक निरीक्षणाखाली उपचार घेत आहे.

दरम्यान, पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार मांजामुळे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने मांजाच्या वापरावर कठोर कारवाई करावी, तसेच अशा जीवघेण्या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts