शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावसह परिसरात नरभक्षक बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. गेल्या २० दिवसात या बिबट्याच्या हल्ल्यात ३ व्यक्तींचा बळी गेला आहे. तर एका बैलावर हल्ला करून त्याला या बिबट्याने ठाकरे केला आहे. अशातच एका १३ वर्षीय मुलाचा या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्र वन विभागाने या बिबट्याला नरभक्षक घोषित करून ठार मारण्याचे आदेश जारी केले आहेत.
नरभक्ष्यक बिबट्याला शोधण्यासाठी शार्प शूटर्सचे पथके, ड्रोन आणि सापळा कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांतील या बिबट्याने घेतलेला हा तिसरा बळी असल्याने मानवी वस्तीजवळ वाढलेला बिबट्यांचा वावर आणि मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या बिबट्यामुळे गावकरी संतप्त झाले असून त्यांनी रास्तारोको केला आणि वनविभागाचे वाहन पेटवून दिले.
हे ही वाचा – इलाका तुम्हारा धमाका हमारा; निंबाळकरांच्या बालेकिल्ल्यात सुषमा अंधारेचे थेट आव्हान
बापाच्या डोळ्यासमोर बिबट्या मुलाला घेऊन गेला..
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे १४ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याचा जीव घेतला. या मुलाला वाचवायला गेलेल्या बापावर बिबट्या गुरकला अन् डोळ्यासमोर बिबट्या त्यांच्या मुलाला घेऊन गेला. लेकरु गेलं आम्हाला बाळ हवं बिबट्या नको असं म्हणत रोहन बोंबेंच्या वडिलांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केलीय. धक्कादायक बाब म्हणजे घटना घडल्यापासून प्रशासन, वनविभागाचा एक आधिकारी कुटुंबाच्या भेटीला आला नसल्याची खंतही व्यक्त केली आहे.
नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला
नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला अशी संतप्त मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली होती. जांबूत, पिंपरखेड परिसरातील नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यासाठी या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी केली आहे. या घटनेची तत्काळ गंभीर दखल घेऊन खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र पाठवून नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्यासाठी एलिमिनेशन ऑर्डर काढण्यासाठी चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन, राज्य सरकार तसेच संबंधित यंत्रणेची परवानगी घेण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी वनविभागाकडं केलीय.
शिरुर लोकसभा मतदारसंघात बिबट्यांचे मनुष्यावरील हल्ले सातत्याने वाढत आहेत. गेल्या दीट महिन्यात हे संकट अधिकच तीव्र झाले असून बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये या काळात चार निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. याखेरीज गेल्या काही दिवसांत वनविभागाने 7 बिबट्यांना जेरबंद केले आहे. पण सातत्याने… pic.twitter.com/93Ui8OkWKG
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) November 2, 2025












