Chanakya Neeti marriage tips : आचार्य चाणक्य यांच्या नुसार, ज्या घरात महिला नियमांचे पालन करून राहतात,त्या ठिकाणी दारिद्र्य कधीच येत नाही. लग्न करत असताना जिवनसाथी ची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु जीवनसाथी अयोग्य निघाल्यास आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे लग्न करत असताना विचार करूनच निर्णय घेणे गरजेचे आहे. नाहीतर आयुष्य बरबाद होऊ शकते. त्याचबरोबर प्रत्येक मुलाने जीवनसाथी निवडताना मुलींमध्ये या गोष्टी बघायला हव्यात. त्याशिवाय चुकीच्या मुलीसोबत लग्न करणे महागात पडू शकते.
धर्म कर्म न मानणारी मुलगी
लग्नासाठी जीवनसाथी निवडणे हे अत्यंत कठीण आहे. जीवनसाथी खराब निघाल्यास संपूर्ण आयुष्य बर्बाद होते. त्यामुळे धार्मिक दृष्ट्या एकनिष्ठ असलेल्या मुलींचाच लग्नासाठी विचार करावा. आचार्य चाणक्यांच्या मते, ज्या मुलीचा धर्म कर्म यावर विश्वास नाही त्या मुली सोबत लग्न करणे अयोग्य आहे. ज्या मुलींना आपल्या धर्म आणि कर्म याचं ज्ञान प्राप्त नसते त्या मुली घराघरात फूट पाडतात. परंतु धार्मिक कार्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणाऱ्या मुली कुटुंबातील सर्व गोष्टी सांभाळून घेतात.
दुसऱ्यांच्या मर्जीने लग्न करणारी मुलगी
बऱ्याचदा लग्न करताना मुलींची इच्छा विचारात घेतली जात नाही. आ परंतु यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतातज-काल प्रेम विवाह करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. एखाद्या मुलीचे दुसऱ्या मुलावर प्रेम असेल परंतु आई-वडिलांचा विरोध असल्यामुळे अशा मुली प्रेशर मध्ये येऊन आई-वडिलांनी सांगितलेल्या मुलासोबत लग्न करतात. (Chanakya Neeti marriage tips)












