Women’s Cricket World Cup Team : एकदिवशीय महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय वाघीनींनी दक्षिण अफ्रिकाचा दारूण पराभव केला. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघावर देशभरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे. त्यातच आता राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. भारतीय संघाने एकदिवशीय विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. या विश्वविजेत्या संघामध्ये महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. या तीन खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सरकारच्या वतीने या तीन महिला खेळाडूंचा सत्कार केला जाईल. भारतीय महिला संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर आता त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील स्मृती मनधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव या तीन खेळाडूंचा सत्कार महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर माध्यमांसमोर बाबतची घोषणा केली.
हेही वाचा –
आपल्या धोरणानुसार त्यांना रोख स्वरुपात बक्षीस देऊन सन्मानित दिले जाईल. भारताची मान उंचावणाऱ्यांचा सर्व प्रकारे सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या काळात जेव्हा शक्य असेल आणि संपूर्ण संघ मुंबईत असेल, तेव्हा संपूर्ण संघाचा सत्कार करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आईसीसी महिला विश्व कप विजेता भारतीय क्रिकेट टीम का सम्मान करने का निर्णय, तेंदुए को पकड़कर रेस्क्यू सेंटर में देने की मुहिम समेत विभिन्न मुद्दों पर मीडिया से संवाद…
(मुंबई | 4-11-2025)#Maharashtra #Mumbai pic.twitter.com/Z28laEPzdr
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 4, 2025
महाराष्ट्राच्या तिन्ही खेळाडूंना किती रोख पारितोषिक दिले जाईल? याची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर टीम इंडियाच्या मेन्स खेळाडूंचा देखील सत्कार राज्य सरकारने केला होता. यामध्ये रोहित शर्मा, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश होता.











