Uddhav Thackeray slams Ajit Pawar : काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप लगावण्यात येत आहे. तर काही ठिकाणी निवडणूक आयोगावर नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपासून बोगस मतदार यादीवर चर्चा सुरू होती. अशातच अचानक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली. आणि राजकीय पक्षात आरोप प्रत्यारोप बघायला मिळालेत. आता उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोफ डागली होती. यावर आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अजितदादा सांगतात की, आम्हाला निवडणूक जिंकायची होती म्हणून आम्ही कर्जमाफीची घोषणा केली. परंतु आम्हालाही अडचणी आहेत. परंतु तुम्ही जरा हातपाय हलवा.. परंतु कोणाला सांगताय तुम्ही? देशाच्या अन्नदात्याला? आता अडचण अशी आली की हातपाय हलवणाऱ्या शेतकऱ्याला तोच हात कपाळावर मारून घ्यायची वेळ आली आहे. मग सरकार म्हणून तुम्ही काय हलवताय ? असा प्रश्न शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर डागलाय.
सध्या शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहे. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर देखील ताशेरे ओढलेत.
ते म्हणाले की, मी आज मत मागायला आलेलो नाही, तर तुमच्या लढ्यासाठी मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर आलो आहे. तुमच्यामुळे मातीत बी पेरून अंकुर फुटतात, तर तुमच्यामुळे या सरकारला पाझर फुटणार नाही का ? आता शेतकरी म्हणून एकत्र येण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. तसेच या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. आणि सरकारवर देखील निशाणा साधत टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray slams Ajit Pawar)
पंचांग बघून मुहूर्तावर मुहूर्त निघून गेले परंतु अद्याप सरकारला मुहूर्त सापडत नाही. अजित पवार बेधडक सांगतात की, आम्हाला निवडणूक जिंकायची होती म्हणून आम्ही कर्जमाफीची घोषणा केली. परंतु आम्हालाही अडचणी आहेत पण तुम्ही जरा हातपाय हलवा असं उपमुख्यमंत्री सांगतात, परंतु कोणाला सांगत आहेत देशाच्या अन्नदात्याला ? आता अडचण अशी आली आहे की हातपाय हलवणाऱ्या शेतकऱ्याला तोच हात कपाळावर मारून घ्यायची वेळ आली आहे. मग सरकार म्हणून तुम्ही काय हलवताय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना विचारलाय.










