Khamenei’s death : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. याबाबत अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया देताना खामेनीच्या मृत्यूनंतर भारतात जो काही जन आक्रोश पाहायला मिळतो तो वेदनादायी आहे असं म्हंटल आहे. भारतीय सैनिक जेव्हा शहीद होतात त्यावेळी काही विशिष्ट वर्ग कधीही रस्त्यावर उतरून पाकिस्तानचा निषेध व्यक्त करताना दिसत नाही अस त्यांनी म्हटलंय. आमदार संग्राम जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार मोनिका राजळे, हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग यांच्या उपस्थितीत अहिल्यानगरच्या मढी येथे हिंदू सभेचे आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.
हेही वाचा – “…तोपर्यंत अमेरिकेचे हल्ले सुरूच राहणार”, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले युद्ध पेटण्याचे संकेत
पण ज्या- ज्यावेळी एखादा आतंकवादी मारला जातो तेव्हा त्याच्या अत्यंविधी मोठी संख्येने लोक त्यात सहभागी होतात. आज कोण माणूस जातो त्याचा यांचा संबंध नाही , याला कधी यांनी पाहिलेलं नाही, हे कधी त्याच्या लग्नाला गेले नाही यांच्या लग्नाला तो कधी आलेला नाही. तो गेल्याने यांना इतक्या वेदना झाल्यात की, यांचा पवित्र रमजान महिना यांना सुखानं जातो की नाही अशी परिस्थिती झालीये असं वक्तव्य आमदार जगताप यांनी व्यक्त केलीये.
त्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे
केवळ मढीतच नाही तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी यांचे अनधिकृत बांधकामं, अनधिकृत धडगे , देवस्थानावर दावा टाकण, पोलीस स्टेशनवर दावा टाकण हे सातत्याने सुरू आहे त्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे, त्यासाठी कडक कायदे झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यात भविष्यात आम्हाला यश येईल असं आम्हाला वाटतंय असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हंटल आहे.
व्यापारी स्वच्छ आणि पवित्र असला पाहिजे
हिंदू धर्मामध्ये आम्ही जिथे नतमस्तक होतो त्याठिकाणी व्यापार करणारा देखील तितकाच स्वच्छ आणि पवित्र असला पाहिजे अशी भूमिका आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केलीये. मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय मढी ग्रामपंचायतने कायम ठेवला आहे यावर आमदार लांडगे बोलत होते. एखादा विशिष्ट समाज उद्रेक करेल या भूमिकेने प्रशासनातील काही अधिकारी काम करत असेल तर राज्य सरकार म्हणून आम्हाला प्रशासनाबाबतही कठोर भूमिका घ्यावी लागेल असं वक्तव्य आमदार लांडगे यांनी केलंय. मढी येथील हिंदू सभेनंतर ते बोलत होते.












