Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची यादी केली जाहीर
Top News

भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची यादी केली जाहीर

BJP LC Candidates List 2026

BJP LC Candidates List 2026 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली तेव्हापासून अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. मात्र, मंडोळी कोणाच्या डोक्याला बांधली जाणार? हे पाहाणं महत्त्वाचं होतं. अखेर आज भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर केली आणि त्यावर शिक्कामोर्तब झाला.

भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात धाराशिव लातूर बीडमधून बसवराज पाटील, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीतून प्रविण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच जळगाव मधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार आता उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भाजपच्या यादीतील 11 उममेदवारांची यादी

1. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – श्री अरुण लखानी
2. भंडारा-गोंदिया- श्री अविनाश ब्राह्मणकर
3. अमरावती श्री प्रविण पोटे पाटील
4. सांगली-सातारा- श्री धैर्यशील कदम
5. सोलापूर – श्री राजेंद्र राऊत
6. अहिल्यानगर – श्री प्राजक्त तनपुरे
7. छत्रपती संभाजीनगर-जालना श्री सुहास शिरसाट
8. नांदेड – श्री अमर राजूरकर
9. धाराशिव-लातूर-बीड – श्री बसवराज पाटील
10. जळगाव श्री. नंदकिशोर महाजन
11. नागपूर – डॉ. राजीव पोतदार

भाजपची यादी दिल्लीत झाली तयार…

भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी कुणाला संधी मिळणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. नावं निश्चित करण्यासाठी अनेक बैठकाही झाल्या होत्या. राज्यात झालेल्या बैठकांमध्ये 48 जणांची नावे फायनल करण्यात आली होती. या 48 नावांची यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे सोपवली होती. भाजपच्या बैठक निर्णय झाल्यानंतर या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

संभाजीनगर भाजपकडेच…

संभाजीनगर-जालना मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आहे. ही जागा आपल्याकडे यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह केला होती. भाजपचे संभाजीनगरचे जिल्हाधक्ष सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. तसेच सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणी यांनाही वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच अलिकडेच भाजपमध्ये सामील झालेले प्राजक्त तनपुरे यांनी अहिल्यानगरमधून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच सोलापूरमधून राजेंद्र राऊत यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला आहे. आता हे सर्व उमेदवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts