Indurikar Maharaj controversy : कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्यांच्या चर्चेचे कारण यंदा दुसरे, तिसरे काही नसून त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामुळे आणि लग्नसमारंभाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. त्यांनी पुन्हा एकदा नवीन वक्तव्य केले आहे.
इंदुरीकर महाराज कीर्तनात इतरांच्या मुलींबाबत बोलतात. मुलींच्या लग्नाबाबत आईवडिलांना लग्न थाटामाटात करू नका असे सल्ले देतात. परंतु स्वतःच्या मुलीच्या लग्नाचा विषय आल्यावर मात्र साखरपुडा थाटामाटात करतात? अशा शब्दात इंदुरीकर महाराजांवर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. त्यांच्यासाठी लोकां सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषाण ही उक्ती वापरली जात आहे. या सर्व आरोप प्रत्यारोपांनंतर इंदुरीकर महाराजांनी ट्रोलिंगला प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी फेटा खाली ठेवून कीर्तन थांबवण्याची भाषा केली. आणि आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
इंदुरीकर महाराजांना ट्रोल केल्यानंतर फेटा खाली ठेऊन कीर्तन थांबवण्याची भाषा केल्यानंतर आता ते फॉर्म मध्ये आल्याचे चित्र दिसत आहे. आता मी माझ्या मुलीचवे लग्न थाटामाटात करेल, ज्यांना बोंबलायचंय त्यांनी बोंबला अशा शब्दात इंदुरीकर महाराजांनी ट्रोलिंग करणाऱ्या व्यक्तींना प्रत्युत्तर दिले आहे. इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या लेकीचा साखरपुडा देखील थाटामाटात केला होता.
ज्ञानेश्वरी आणि साहिल यांची एन्ट्री भव्य रथातून झाली. या साखरपुड्याला इंदुरीकरांनी किती खर्च केला पाहा. ज्ञानेश्वरी आणि साहिल यांच्या साखरपुड्याला अडीच हजार पाहुणे उपस्थित होते. जेवणाची थाळी – प्रत्येकी अंदाजे 150 रुपये होती. लॉनचं भाडं – 1 लाख रुपये, सजवलेल्या वाहनांची संख्या – 25, स्वागतासाठी गेटवर भव्य रांगोळी, वधू-वराच्या आगमनासाठी भव्य रथ, साखरपुड्यात फोटोग्राफर, रील मेकर, साखरपुड्याला अनेक राजकीय मंडळीही उपस्थित होती.
एकीकडे लग्नात होणारा खर्च आणि मुली ज्याप्रकारे लग्नात मेकअप आणि डान्स करतात त्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे महाराज स्वत:च्या मुलीच्या साखरपुड्यात आपलेच उपदेश विसरले, असं म्हटलं जात आहे.
काय म्हणाले इंदुरीकर –
इंदुरीकर महाराजांचा साखरपुडा एकझ महिन्यात पार पडला. या साखरपुड्यातील त्यांच्या मुलीचा लूक, तिने घातलेले कपडे, तिने केलेला नाच या सर्व बाबींवर विचार करून नेटकरी इंदुरीकर महाराजांवर प्रचंड नाराज झाले होते. नेटकऱ्यांनी इंदुरीकर महाराजांना ट्रोल करत कीर्तनात केलेल्या उपदेश स्वतःही आत्मसात करावे असे म्हंटले होते. ते ट्रोल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी केलेली टीका इंदुरीकर महाराजांच्या जिव्हारी लागली होती. लेकीवर केलेल्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज व्यथित झाले होते. त्यांनी फेटा खाली ठेवायचा विचार केला होता. ट्रोलिंग माझ्यापर्यत ठीक होते, परंतु माझ्या घरादारापर्यंत हे यायला नको होते, कुटुंबापर्यंत गेल्यावर मजा नाही, याची अक्कल इंदुरीकर यांना यायलाच पाहिजे, त्याने कीर्तन बंद केले पाहिजे, आता इंदुरीकरांनी फेटा ठेऊन द्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले होते. (Indurikar Maharaj controversy)












