Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • आसाममध्ये राजधानी एक्सप्रेसनं धडक दिल्यानं आठ हत्तींचा मृत्यू; इंजिनसह पाच डबे रुळावरुन घसरले, प्रवासी सुखरुप
ताज्या बातम्या

आसाममध्ये राजधानी एक्सप्रेसनं धडक दिल्यानं आठ हत्तींचा मृत्यू; इंजिनसह पाच डबे रुळावरुन घसरले, प्रवासी सुखरुप

होजई : आसामच्या होजई जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा सायरंग-आनंद विहार टर्मिनल राजधानी एक्सप्रेसचे पाच डबे रुळावरुन घसरले. राजधानी एक्सप्रेसचे इंजिनही रुळावरून घसरले. काल रात्री हत्तींचा एक कळप राजधानी एक्सप्रेसला धडकला. यात आठ हत्तींचा मृत्यू झाला आणि एक हत्ती जखमी झाला. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही.

इंजिनसह पाच डबे रुळावरुन घसरले :

ईशान्य सीमा रेल्वे (एनएफआर) च्या प्रवक्त्यानं सांगितलं की, या घटनेत पाच डबे आणि इंजिन रुळावरून घसरले, जरी कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. नवी दिल्लीला जाणारी ट्रेन पहाटे 2:17 वाजता अपघातग्रसत झाली असं प्रवक्त्यानं सांगितलं. नागाव विभागीय वन अधिकारी सुहास कदम यांनी सांगितले की, ही घटना होजई जिल्ह्यातील चांगजुराई भागात घडली. सुहास कदम आणि इतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

राजधानी एक्सप्रेस दिल्ली आणि मेघालय दरम्यान धावते :

एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, प्रभावित जमुनामुख-कामपूर सेक्शनमधून जाणाऱ्या गाड्या अप लाईनवरुन वळवल्या जात आहेत आणि रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सुरु आहे. सायरंग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस मिझोरममधील सायरंग (ऐझवालजवळ) ते आनंद विहार टर्मिनल (दिल्ली) यांना जोडते.

रेल्वे सेवा विस्कळीत :

सूत्रांनी सांगितलं की, रुळावरुन घसरल्यानं आणि हत्तीच्या शरीराचे अवयव रुळांवर विखुरल्यामुळं अप्पर आसाम आणि ईशान्येकडील इतर भागांना जाणाऱ्या रेल्वे सेवा प्रभावित झाल्या आहेत. बाधित डब्यांमधील प्रवाशांना तात्पुरते इतर डब्यांमध्ये रिकाम्या बर्थमध्ये ठेवण्यात आले आहे. ट्रेन गुवाहाटी पोहोचल्यानंतर, सर्व प्रवाशांना सामावून घेण्यासाठी अतिरिक्त डबे जोडण्यात येतील, त्यानंतर ट्रेन पुढे प्रवास सुरू करेल. ही घटना हत्ती कॉरिडॉर म्हणून नियुक्त नसलेल्या भागात घडली. रुळांवर हत्तींचा कळप दिसल्यानंतर लोको पायलटनं आपत्कालीन ब्रेक लावले. तरीही, हत्ती ट्रेनशी आदळले, ज्यामुळे टक्कर आणि रुळावरून घसरण झाली.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts