Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला मराठवाडाच्या विकासाचा रोड मॅप
Top News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला मराठवाडाच्या विकासाचा रोड मॅप

Devendra Fadnavis Marathwada Development

Devendra Fadnavis Marathwada Development : सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून सत्ता काबीज करण्यासाठी मतदारांना वेगवेगळी आश्वासने दिली जात आहेत. कोणाकडून वचननामे जाहीर केली जात आहेत तर कोणाकडून मोठं -मोठे विकासाचे गाजर दाखविले जात आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडाच्या विकासाचा रोड मॅप सांगितलं. छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील प्रमुख शहर मानलं जातं. परंतू वर्षानुवर्ष इथे दुष्काळ आणि रोजगाराचा वणवा आढळतो. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही याकडे कसे पहाता, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा रोड मॅप सांगितला. तर दोन दिवसांनी म्हणजे १० जानेवारीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संभाजीनगर येथे जाहीर सभा पार पडणार आहे. त्यामुळे ठाकरी तोफ कशा प्रकारे प्रतिवार करते हे पहाणे महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा – आमदार मेहता मुख्यमंत्री फडणवीसांचेही आदेश ऐकत नाहीत?; मंत्री प्रताप सरनाईक

विदर्भासोबत मी मराठवाड्याचा विषय देखील मांडायचो – फडणवीस

मुळामध्ये बघा मी विदर्भातून येतो, आणि मराठवाडा व विदर्भातील मागासपणाबद्दल वर्षानुवर्ष लढणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. 99 पासून महाराष्ट्रातील विधानसभेत जेव्हा महाराष्ट्रातील मागास भागाची लढाई सुरू केली, तेव्हा फक्त विदर्भ नाही तर विदर्भासोबत मी मराठवाड्याचा विषय देखील मांडायचो. म्हणजे जे काही दुःख आहे, ते विदर्भ आणि मराठवाड्याचं सारखंच आहे, त्यामुळे आम्ही ते दुःख समजून घेतलं, आणि म्हणूनच मला जेव्हा पहिल्या टर्मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ज्यावेळी दिल्ली- मुंबई कॉरिडॉर घोषीत झाला, त्याचं काम सुरू झालं, तेव्हा सगळ्यात जास्त वेगानं डीएमआयसीचं काम आपण महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरात केलं, असं यावेळी बोलताना फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विकासाची वाटचाल मोठ्या वेगानं पुढे जात

पुढे बोलताना ते म्हणाले की, ऑरिक सिटी जे आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न होतं, आपण देशातील पहिली इंटीग्रेटेड इड्रस्टिअल टाउनशिप ही ऑरिक सिटीच्या रुपानं तयार केली. आणि आज एक मॅगनेट म्हणून आपल्याला ही डीएमआयसी आणि हा जो काही छत्रपती संभाजीनगरचा इकोसिस्टिम आहे, ती आपल्याला एखाद्या मॅगनेटसारखी दिसते. ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला, डीएमआयसी केली, मी 2015 मध्ये सांगायचो की महाराष्ट्रातील पुढील डेस्टिनेशन हे पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगर असणार आहे, त्यावेळी अनेकांना ती अतिशोयोक्ती वाटयाची पण आज ते झालं आहे. ही जी काही विकासाची वाटचाल आहे ती मोठ्या वेगानं पुढे जात आहे. आमची तर टॅगलाईन आहे, आता महाराष्ट्र थांबणार नाही. पण तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगरही आता थांबणार नाही. मराठवाड्यात अनेक कंपन्या येत आहेत, किर्लोस्करचा प्रोजेक्ट इथे आला, जेएसडब्लूचा प्रोजेक्ट इथे आला. मी इथेल्या उद्योजकांचं देखील अभिनंदन करतो, त्यांच्या संघटनांनी अतिशय चांगलं काम केलं आहे, असं वीस यांनी म्हटलं

टॉक शोचा झगमगाट, पण छत्रपती संभाजीनगरच्या प्रश्नांचा अंधार! अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा झालेला ‘टॉक शो‘ म्हणजे शहराच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन केलेली केवळ ‘इव्हेंटबाजी‘ ठरली. साहेब, तुम्ही गप्पा मारून पुढे रवाना झालात, पण शहरवासीयांचे हे रोखठोक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत, असं माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts