Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • आमदार मेहता मुख्यमंत्री फडणवीसांचेही आदेश ऐकत नाहीत?; मंत्री प्रताप सरनाईक
Top News

आमदार मेहता मुख्यमंत्री फडणवीसांचेही आदेश ऐकत नाहीत?; मंत्री प्रताप सरनाईक

MLA Mehta CM Fadnavis Orders

MLA Mehta CM Fadnavis Orders : मीरा-भाईंदर येथे ११ तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार याची माहिती देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कथित गुन्हेगारी आणि भ्रष्ट कारभारावर जोरदार टीका केली.  स्वतःच्या राजकीय आणि वैयक्तिक फायद्यासाठी आमदार नरेंद्र मेहता मीरा-भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत असल्याचा गंभीर आरोप सरनाईक यांनी केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही निर्देश आमदार मेहता धुडकावत असल्याचे दिसून येत असल्याचे सरनाईक म्हणाले. त्यामुळे मीरा-भाईंदर मध्ये भाजप-शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप केल्याचे समोर येत आहेत.

हेही आहे – “मराठी माणसाच्या सहीनं डेथ वारंट निघालंय;” राज ठाकरे कडाडले

मीरा-भाईंदर शहरातील महत्त्वाचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असून पाणीटंचाई आणि मेट्रो प्रकल्प रखडण्यामागे केवळ आणि केवळ आमदार नरेंद्र मेहता कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही निर्देश आमदार मेहता धुडकावत असल्याचे दिसून येत असल्याचे सरनाईक म्हणाले. येत्या ९ तारखेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असून, आम्ही युतीत आहोत, देवेंद्र फडणवीस हे आमचे मुख्य नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेचे स्वागत आम्ही पूर्ण ताकदीने करणार, असं स्पष्ट करत सरनाईक यांनी युतीतील भूमिका अधोरेखित केली.

येत्या ११ तारखेला याच ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. गौमातेला राजकीय दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताम्रपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. दरम्यान, मीरा-भाईंदर शहराच्या विकासाला खीळ घालणार्‍या निर्णयांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, आमदार नरेंद्र मेहता यांच्या भूमिकेमुळे शहराचा विकास ठप्प झाल्याचा आरोप मंत्री सरनाईक यांनी केला आहे. आगामी सभांच्या पार्श्वभूमीवर हे आरोप शहराच्या राजकारणात नवे वळण देणारे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सरनाईक यांच्या आरोपांना आमदार मेहता कशाप्रकारे प्रतिउत्तर देतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts