Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मुंबईतील मतदान केंद्रावर सापडला पहिला दुबार मतदार; मतदानाला सर्वत्र सुरुवात
Mumbai

मुंबईतील मतदान केंद्रावर सापडला पहिला दुबार मतदार; मतदानाला सर्वत्र सुरुवात

Mumbai Get New Mayor

maharashtra municipal election : मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी होणा-या मतदानाला आज सुरवात झाली. या निवडणुकीत १७१६ उमेदवार आपेल नशीब आजमावणार आहेत. एकंदरीत 10 हजार 231 मतदान केंद्रावर मतदान केले जाणार असून मुंबईतील सर्व मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदानकेंद्रावर आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून मुंबई महापालिकेमध्ये पहिला दुबार मतदार सापडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदाराबाबत ठाकरे बंधू यांनी आक्रमक भूमिका बजावली होती. दुबार मतदार दिसल्यास त्याला तिथेच फोडा, असे आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिले आहे. आता मुंबईतील दादर वॉर्ड क्रमांक 192 मध्ये मुंबईतील पहिला दुबार मतदार निदर्शनास आला आहे.

हे ही वाचा : आज सकाळपासून महापालिका निवडणुकांना सुरुवात; पहा अपडेट्स

दादरध्ये दुबार मतदार आढळला

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार सकाळीच मतदान केंद्रावर उपस्थित होते. त्याचवेळी महिला दुबार मतदार आढळून आला. त्यांनतर त्यांना तेथेच थांबवण्यात आले असून आधारकार्ड पाहून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आले आहे. म्हणजे आता त्यांना मतदान करून दिले जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ही सर्व चूक निवडणूक आयोगाची असल्याचा आरोप यशवंत किल्लेदार यांनी लगावला आहे.

64 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

आज मतदान सुरळीत पार पडावे यासाठी 64 हजार 375 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 4500 स्वयंसेवकांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. यासोबतच मतदानासाठी मतदान यंत्रणांची साठवणूक करण्यात आली असून विक्रोळी भागातील गोडाऊन मध्ये 10800 कंट्रोल युनिट ठेवण्यात आले आहे तर 13500 बॅलेट युनिट याठिकाणी ठेवण्यात आले आहे. तर कांदिवली येथे असलेल्या गोडाऊन मध्ये 9200 कंट्रोल युनिट तर 11500 बॅलेट युनिट ठेवण्यात आले आहेत.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts