Zilla Parishad Panchayat Samiti nominations : सध्या राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. २१ जानेवारी ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर आता राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायती समित्यांमध्ये एकूण उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलीय. १२ जिल्हा परिषदांमध्ये ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. तर १२५ पंचायत समित्यांमधील १ हजार ४६२ जागांसाठी १३ हजार २३ अर्ज दाखल झाले आहे. आता २७ जानेवारीपर्यंत किती उमेदवार अर्ज माघे घेणार आणि किती निवडणुकीच्या प्रत्यक्ष रिंगणात उतरणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांबाबत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यानंतर तारीख जाहीर होणार आहे.
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक
रायगड जिल्ह्यातील ५९ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ३९१ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. तर ११८ सदस्य संख्या असलेल्या रायगड पंचायत समितीसाठी ६९७ नामनिदर्शन पत्रे दाखल झाली आहेत. रत्नागिरीतील ५६ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी २२६ नामनिदर्शन पत्रे दाखल झाली आहेत. तर ११२ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीसाठी ४४४ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.
हेही वाचा – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिवादन
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी २७२ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. तर १०० सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीसाठी ४४१ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. पुणे जिल्ह्यातील ७३ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ८५३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. तर १४६ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीसाठी १४८२ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक
सातारा जिल्ह्यातील ६५ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ६३२ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. तर १३० सदस्य संख्या असलेल्या पंचायत समिती १०५९ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. सांगलीतील ६१ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ७४६ अर्ज आले आहेत तर १२२ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीसाठी १२८९ अर्ज आले आहेत.
सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक
सोलापूर जिल्ह्यातील ६८ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ७५६ अर्ज आले आहेत. तर १३६ सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीसाठी १३७१ अर्ज आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ६८ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ९०७ अर्ज आले आहेत तर १३६ सदस्य असलेल्या पंचायत समितीसाठी १५२९ अर्ज आले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या ६३ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ७६२ अर्ज आले तर १२६ सदस्य असलेल्या पंचायत समितीसाठी १४५६ अर्ज आले आहेत.
परभणीत पंचायत समितीसाठी ९४४ तर जिल्हा परिषदेसाठी ९६७ अर्ज आले
परभणी जिल्हा परिषदेच्या ५४ जागांसाठी ५८६ अर्ज तर १०८ सदस्य असलेल्या पंचायत समितीसाठी ९४४ अर्ज आले आहेत. धाराशिव जिल्हातील ५५ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ९६७ अर्ज आले आहेत. तर ११० सदस्य असलेल्या पंचायत समितीसाठी १३६० अर्ज आले आहेत. लातूरच्या ५९ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेसाठी ५९७ अर्ज आले आहेत तर ११८ सदस्य असलेल्या पंचायत समितीसाठी ९५१ अर्ज आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक
छत्रपती संभाजीनगरात जिल्हापरिषद निवडणूकीत आमदार अब्दुल सत्तार यांचा दुसरा मुलगा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहे. पैठण नगर परिषदमध्ये सत्ता स्थापन करीत पहिला मुलगा अब्दुल समीर सत्तार याला आमदार अब्दुल सत्तार यांनी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवले. आता अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला जिल्हा परिषद निवडणूकमध्ये उभे केले आहे. आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल आमेर सत्तार हा अंबई जिल्हा परिषदेच्या सर्कल मधून निवडणूक लढवत आहे.
लातूरमध्ये ५९ पैकी ५१ जागांवर भाजपा लढत
लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ पैकी ५१ जागांवर भाजपा लढत आहे. भाजपाची राष्ट्रवादी सोबत उदगीर, जळकोट आणि चाकुर तालुक्यात युती झाली आहे. तर शिवसेना शिंदे केवळ एका जागेवर लढते आहे, तिथे भाजपाने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. भाजपा ५१ तर राष्ट्रवादी दादा ७ जागांवर लढत आहे. जास्तीत जास्त जागा भाजपाकडे आहेत त्यामुळे जिल्ह्यात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होण्याची चिन्हे आहेत.












