Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ‘आज बाळासाहेब नाहीत तेच बरंय’ राज ठाकरे जन्मशताब्दी कार्यक्रमात काय बोलून गेले..
Top News

‘आज बाळासाहेब नाहीत तेच बरंय’ राज ठाकरे जन्मशताब्दी कार्यक्रमात काय बोलून गेले..

Raj Thackeray statement on Balasaheb

Raj Thackeray statement on Balasaheb : आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे, बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे, यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजळला दिला. यावेळी राज ठाकरे चांगलेच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीचा देखील आपल्या खास शैलीमध्ये समाचार घेतला आहे. सध्याचे महाराष्ट्रातील राजकीय चित्र पाहिल्यानंतर आज मला वाटतं की बाळासाहेब नाहीत ते बरं आहे. तो माणूस किती व्यथित झाला असता त्या माणसाला काय त्रास झाला असता. असे महाराष्ट्रासमोर चित्र उभं राहिलं आहे.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. सामनात माझा आज एक लेख आला आहे. मी त्यात त्यांच्याविषयी अनेक आठवणी लिहिल्या आहेत. खरंतर त्या व्यक्तीला कसं पाहायचं? कसं मांडायचं? हे माझ्यासमोर अनेकदा प्रश्न उभे राहतात. काका म्हणून मांडायचं? व्यंगचित्रकार म्हणून मांडायचं की शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट म्हणून मांडायचं? त्यांच्यावर बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो, मी आणि उद्धव तुमच्याशी तास न् तास बोलू शकतो.’

पूर्वी दोनशे वर्षापूर्वी चावडीवर उभं राहून माणसांचे लिलाव चालायचे. आजही ते लिलाव सुरू आहेत, कल्याण डोंबिवली ठाणे अशा अनेक ठिकाणी हे सर्व सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी माझं बोलणं झालं. परिस्थिती पाहून शिसारी आली, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना केला आहे.

बाकीच्या पक्षात बघा, अनेक लोकं दिसतील जे बाळासाहेबांनी उभे केले आहेत. पण ज्या गोष्टी घडत जातात, घडत गेल्या, मी ज्यावेळी पक्षातून बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं तर माझ्यसाठी कुटुंब सोडणं होतं. २० वर्षांचा काळ निघून गेला. अनेक गोष्टी मलाही उमजल्या, मला वाटतं अनेक गोष्टी उद्धव यांनाही उमजल्या असतील, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts