Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • २०२९ पंतप्रधानपदाच्या चर्चेतून ‘ऑपरेशन टायगर’वर राज ठाकरे यांचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?
Top News

२०२९ पंतप्रधानपदाच्या चर्चेतून ‘ऑपरेशन टायगर’वर राज ठाकरे यांचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray on Operation Tiger
Raj Thackeray on Operation Tiger: मुंबईत झालेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रातील राजकीय घडामोडींवर मोठे वक्तव्य करत नवे वाद निर्माण केले आहेत. २०२९ मध्ये अमित शाह पंतप्रधान होण्याच्या तयारीत असल्याचे संकेत असल्याचा दावा करत त्यांनी राजकीय रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले.

राज ठाकरे यांनी सांगितले की, ठाकरे गटातील काही खासदार थेट भाजपमध्ये न जाता एकनाथ शिंदे यांच्या गटात का गेले, यामागे मोठी रणनीती असू शकते. त्यांच्या मते. “केंद्रात सत्ता भाजपची असताना हे खासदार थेट भाजपमध्ये न जाता शिंदे गटात गेले. यामागे भविष्यातील पंतप्रधानपदाचे समीकरण असू शकते.”

हेही वाचा: मोठी बातमी! ‘शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही’; ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया

ऑपरेशन टायगरवर नेमकं काय म्हणाले? – राज ठाकरे

यावेळी त्यांनी “ऑपरेशन टायगर”(Raj Thackeray on Operation Tiger) चा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. शिंदे यांना या प्रक्रियेसाठी वरिष्ठ पातळीवरून ग्रीन सिग्नल मिळाला असावा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. या घडामोडींमध्ये ठाकरे गटातील संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर आणि नागेश आष्टेकर पाटील यांचा उल्लेख त्यांनी केला.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुढे म्हटले की, सध्या राजकीय वातावरणात अनेक अंतर्गत घडामोडी सुरू असून केंद्रीय भविष्यात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जमिनीवर राहून संघटन मजबूत ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला.

याशिवाय त्यांनी मतदार याद्या, जनगणना आणि दुबार मतदार नोंदणीवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. जनगणना प्रक्रियेदरम्यान स्थानिक पातळीवर कोणाची नोंद कशी केली जाते, यावर डोळ्यावर तेल घालून लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

दुबार मतदानाचा मुद्दा

दुबार मतदानाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी विविध राज्यांतील मतदारांची नोंदणी एकापेक्षा जास्त ठिकाणी होत असल्याचा आरोप केला. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी मजबूत यंत्रणा उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

शेवटी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत सत्ता ही कायमस्वरूपी नसते, असा इशारा दिला. कोणतीही राजकीय शक्ती अजेय नसते आणि भविष्यात समीकरणे बदलू शकतात, असेही ते म्हणाले. (LS Marathi News Channel) 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts