Sanjay Raut Claim: शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलेअसून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि बंडखोर नेत्यांवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक गंभीर आरोप करत राजकीय वातावरण ढवळून काढले.
“मंत्रिपद न मिळणाऱ्यांना वेगळे २५ कोटी रुपये दिले जात आहेत,” असा आरोप राऊत यांनी केला. तसेच, “आम्ही सहा खासदार फुटले असे म्हणत नाही, मात्र परिस्थिती वेगळी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या सहा खासदारांपैकी केवळ एकालाच मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा असल्याने त्यांनी नमूद केले.
हेही वाचा : पालकांनो लक्ष द्या! मुलं ऐकत नाहीत, सतत रागावतात? मग ओरडण्याआधी ‘या’ 4 गोष्टी करून पाहा
Sanjay Raut Claim: आमदार आणि खासदारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
संजय दीना पाटील यांच्या संदर्भात बोलताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले,” काल आम्ही त्यांची वाट पाहता होतो. त्यांना जाण्याचे काहीच कारण नव्हते. बैठकीला यावं असं त्यांना वाटलं नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांना आमदार आणि खासदारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
भाजपवर निशाणा साधताना राऊत म्हणाले, “अर्धा तास ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवा, भाजपचे तुकडे होतील.” त्यांनी तपास यंत्रणांचा वापर राजकीय दबावासाठी केला जात असल्याचा आरोप केला. तसेच, राजुल पाटील यांच्यावर टीका करत “त्यांनी आधी आपल्या वडिलांबद्दल स्पष्ट करावं,” असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार?
दरम्यान, शिवसेनेच्या (Shiv Sena MPs deal) वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचंही कौतुक केलं. “राहुल देशाचे नेता आहेत. ते नेहमी खरे बोलतात आणि निष्ठेने काम करतात,” असे राऊत म्हणाले.
या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.












