Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • अजितदादा बारामतीच्या मातीत विसावले, दादा अनंतात विलीन, अवघा महाराष्ट्र हळहळला
Top News

अजितदादा बारामतीच्या मातीत विसावले, दादा अनंतात विलीन, अवघा महाराष्ट्र हळहळला

Ajit Pawar has merged into eternity

Ajit Dada Last Rites Baramati : आपल्या रांगड्या, परखड आणि रोखठोक शैलीने अनेकांना आपलं करून सोडलेल्या अजित पर्वाचा आज अंत झाला. कामाचा माणूस म्हणून त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत आपली प्रतिमा ठेवली. अजितदादांनी ग्रामीण महाराष्ट्राशी नाळ जोडलेली नाळ आज त्यांच्या अचानक जाण्याने दुःख देऊन गेली. स्वतः साठी राजकीय विद्यापीठ करून घेतानाच दिलेला शब्द मोडायचा नाही, आपण कामाचा माणूस आहे. हे जपताना केलेला संघर्ष या आणि असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये आज दि. जानेवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमात निरोप देण्यात आला.

हेही वाचा – काही क्षणात सर्वांचे लाडके अजित दादा अनंतात विलीन होणार

अजितदादांच्या या निधनाने दादांचा झंझावात बारामतीच्या मातीत कायमचा विसावला, असून सामन्यांच्या कामाचा माणूस आज अनंतात विलीन झाला. त्यांना निरोप देताना सह्याद्री देखील हळवा झाल्याचे पाहायला मिळाला. अजित पवार यांच्या पार्थिवाला त्यांचा मोठा मुलगा पार्थ आणि लहान मुलगा जय पवार यांनी मंत्राग्नि दिला. यावेळी अवघ्या बारामतीसह राज्यात सन्नाटा पसरला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजित दादा अमर रहे चा गजर करत आपल्या लाडक्या दादाला निरोप दिला.

यावेळी महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या प्रेमाची साक्ष देत होता. नेहमी खडसावणरे दादा, मदतीसाठी धावणारे दादा आज निपचित आहेत हे अनेकांसाठी काळीज कुरतडणारे होते. त्यामुळे अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या, अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात चबुतरा उभारण्यात आला होता. चबुतऱ्यावर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते.

हजारोंचा जमावाला अश्रु अनावर झाले

अजित पवार यांचे पार्थिव सकाळी काटेवाडीत ठेवण्यात आले होते. यावेळी हजारोंचा जमावाला अश्रु अनावर झाले. यावेळी झालेली अभूतपूर्व गर्दी पोलिसांना सुद्धा रोखणं अशक्य झालं होतं. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विनंतीनंतर जमाव नियंत्रित झाला. अजित पवार यांनी मुळगावी श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या पार्थिवाचे पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या भगिनी तसेच सून यांनी अंत्यदर्शन घेतले.

लाडक्या नेत्याला दिग्गजांकडून श्रद्धांजली

अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून राजकीय नेते बारामतीमध्ये दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नबिन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, छगन भुजबळ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आंध्र प्रदेश सरकारमधील नारा लोकेश, गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, माधुरी मिसाळ, नीलम गोहे, अदिती तटकरे, पंकजा मुंडे, गणेश नाईक, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील या दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ, शिवेंद्रराजे भोसले, हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, प्रफुल पटेल, रितेश देशमुख, मेधा कुलकर्णी, निवेदिता माने, अमोल कोल्हे, राजेश टोपे, सुरेश धस, संजय दिना पाटील, सचिन अहिर, मेघना बोर्डीकर, मकरंद पाटील, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा, प्रकाश आबिटकर, श्रीकांत शिंदे,राहुल कुल यांच्यासह अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली अर्पण वाहिली.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts