Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! RBI मध्ये यंग प्रोफेशनल्सची भरती सुरू; जाणून घ्या दरमहा किती मिळणार मानधन
शैक्षणिक बातम्या

तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! RBI मध्ये यंग प्रोफेशनल्सची भरती सुरू; जाणून घ्या दरमहा किती मिळणार मानधन

RBI Young Professionals Recruitment 2026

RBI Young Professionals Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. RBI ने यंग प्रोफेशनल्स पदांसाठी भरती जाहीर केली असून, अर्ज प्रक्रिया आणि मानधनाबाबतची माहिती जाणून घेऊया.

देशातील सर्वोच्च बँकिंग संस्थेत काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. Reserve Bank of India (RBI) ने 2026 साठी यंग प्रोफेशनल्स (Young Professionals) कार्यक्रमांतर्गत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या उपक्रमाद्वारे विविध विषयांमध्ये कौश्क्य असलेल्या उमेदवारांना RBI च्या मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात काम करण्याची संधी मिळणार आहे.

या भरतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, हवामानविषयक वित्तव्यवस्था, डिजिटल पेमेंट प्रणाली, वित्तीय संशोधन आणि धोरणात्मक अभ्यास अशा आधुनिक आणि महत्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया १६ जून पासून सुरू झाली असून अर्जाची शेवटची तारीख ६ जुलै आहे. इच्छुक उमेदवारांनी yphrmdco@rbi.org.in या ई- मेलद्वारे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : NEET RE Exam आधी टेलिग्राम बंद; व्हॉट्सअॅप मात्र कायम सुरू, कारण वाचून आश्चर्य वाटेल?

कोणत्या क्षेत्रांमध्ये मिळणार संधी?

यंग प्रोफेशनल्स कार्यक्रमांतर्गत AI, क्वांटम टेक्नॉलॉजी, सस्टेनेबल फायनान्स, क्लायमेट रिस्क मॅनेजमेंट, डेटा अॅनालिटिक्स, वित्तीय बाजारपेठ, पेमेंट सिस्टीम, क्रेडिट रिस्क मूल्यांकन, धोरण संशोधन आणि नियामक देखरेख यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

आकर्षक मानधनाची सुविधा

या कार्यक्रमासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १.५ लाख रुपयांचे निश्चित मानधन दिले जाईल. नियुक्ती कराराधारित पद्धतीने होणार असून प्रारंभीचा कालावधी तीन वर्षाचा असेल. कामगिरी समाधानकारक असल्यास कराराचा कालावधी वाढवता येईल. मात्र, एकूण कालावधी पाच वर्षांपेक्षा जास्त असणार नाही.

अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक?

अर्जदारांनी ई-मेलद्वारे अर्ज पाठवताना खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे

अद्ययावत CV किंवा बायोडाटा
शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
संबंधित क्षेत्रात काम करण्यामागील उद्देश स्पष्ट करणारे निवेदन
संशोधन किंवा लेखनाचा नमुना
अनुभवी व्यक्तीचे शिफारसपत्र अथवा संदर्भ

एका पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा लागेल.

निवड प्रक्रिया कशी होणार?

उमेदवारांच्या अर्जांची प्राथमिक छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील. त्यानंतर वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड करण्यात येईल. निवड प्रक्रियेतील पुढील माहिती ई-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे.

RBI ने स्पष्ट केले आहे की, अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदासाठीच्या पात्रता अटी आणि निकष काळजीपूर्वक वाचावेत. अपूर्ण माहिती असलेले किंवा अंतिम मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts