Mumbai Human Trafficking Minors Missing : मुंबईतून चिंताजनक बातमी समोर आली आहे. मागील ३६ तासांमध्ये एकट्या मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. या घटनेमुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. बेपत्ता झालेल्या १२ अल्पवयीन मध्ये ८ मुलींचा तर ४ मुलांचा समावेश आहे. मुंबईतील ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मुलं बेपत्ता झालीय. त्यामुळे मुंबई पोलिासंनी हाय आलर्ट जारी केलाय. एकाच वेळी इतकी मुलं बेपत्ता झाल्यामुळे मानवी तस्करी करण्याऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
भारताची आर्थिकि राजधानी असलेल्या मुंबईतून अलपवयीन मुलांचे बेपत्ता होणे, ही गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कमम १३७ (२) अंतर्गत १२ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता होण्याच्या या प्रकारामुळे मुंबईत कार्यरत असलेल्या संघटित बाल तस्करी टोळीबद्दल चिंता आणखी बळावली आहे. पोलिसांनी मुलांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पथके नेमण्यात आली आहेत.
हेही वाचा – चेक पोस्ट बनला लुटीचा अड्डा! ट्रक चालकांकडून अवैध वसुली, खासदारांकडून भोंगळ कारभार चव्हाट्यावर
बेपत्ता झाल्याने मुलांची वाढती संख्या लक्षात घेता आता मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. शिवजीनगर- ४, साकीनाका- ४, अँटाॅप हिल- २, ओशिवारा -१, मानखुर्द -१, बांगूर नगर -१ आणि घाटकोपर – १ या भागांतून तक्रारी घडल्याच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या असून, मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दररोज सरासरी ४ ते ५ अल्पवयीन मुली बेपत्ता
जून ते डिसेंबर २०२५ दरम्यान मुंबईतून १४५ मुले बेपत्ता झाली, ज्यामध्ये ९३ मुलींचा समावेश होता. दैनिक आकडेवारीनुसार मुंबईतून दररोज सरासरी ४ ते ५ अल्पवयीन मुली बेपत्ता होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोणाला काही संशय किंवा कोणती माहिती मिळताच १०० नंबरवर किंवा स्थानिक पोलिस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांसाठी हाय अलर्ट जारी
बेपत्ता प्रकरणांच्या वाढत्या संख्येमुळे पोलिस यंत्रणा सक्रिय झाली आहे. पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. शहरभरात हरवलेल्या मुलांचे फोटो प्रसारित केले. बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबईत विशेष मोहीम राबवण्यात येत आहेत. गजबजलेल्या बाजारपेठा, सार्वजनिक बागा, रेल्वे स्थानके, बस डेपो, रुग्णालये, बालगृहे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी बेपत्ता मुलांची फोटो प्रसारित करण्यात आली आहेत. तपासात सायबर सेलला सामील केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजचे तपशीलवार विश्लेषण सुरू केले.











