The murder was solved within 3 days : चार दिवसांपूर्वी गडचिरोलीच्या (Korchi Crime News) कोरची तालुक्यातील बोगाटोला गावाजवळच्या तलावाजवळ जमिनीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळलेल्या एका मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात कोरची पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश (Crime Branch team achieves success) आले. अनैतिक संबंधात (Husband murdered due to extramarital affair) अडसर ठरल्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून इतर 3 लोकांच्या मदतीने त्या युवकाची हत्या (The young man was murdered) केल्याचे स्पष्ट झाले. यातील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक (Five accused arrested) केली. आव्हानात्मक असलेल्या या हत्येचा अवघ्या 72 तासात पोलिसांनी उलगडा केला (The police solved the case in 72 hours) आहे.
हेही वाचा – केंद्रीय टीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट
सविस्तर घटना अशी की, मौजा बोगाटोला येथील जंगल परिसरातील तलावाजवळ 31 जानेवारी रोजी अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळला होता. मृतदेहाचा चेहरा कुजलेला असल्याने मृताची ओळख पटवून तपास करणे अत्यंत आव्हानात्मक होते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली कोरची व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने संयुक्तपणे तपासास सुरुवात केली.
क्लिष्ट अशा गुन्हाचा तपास करतान हत्येचा उलगडा
वैद्यकीय अहवालानुसार, मृत इसमाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे उघड झाल्याने 2 फेब्रुवारी रोजी कोरची पोलिसांनी कलम 103 (1), 238 भान्यासं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने केवळ घटनास्थळावरील दुवे व गोपनिय बातमीदारांच्या मदतीने क्लिष्ट अशा गुन्हाचा तपास करताना या हत्येचा उलगडा झाला. कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथील शानू पठाण याचे मृत इसम जितू कंवर (30 वर्षे), रा. जेठकन्हार, ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव (छत्तीसगड) याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात जितू कंवर हा अडसर ठरत असल्याने सोनाली कंवर (25 वर्ष) रा.जेठकन्हार (ता.डोंगरगड) हिच्या मदतीने कट रचून आरोपी शानू पठाण याने जितू कंवर याला कायमचे संपविण्याचा कट रचला.
धारदार शस्त्राने मानेवर वार करुन त्याचा खून
जितू हा खुर्शिपार ता.कोरची येथे आलेला असताना शानू याने आपल्या तीन सहकाऱ्यांच्या मदतीने धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर वार करुन त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह बोगाटोला जवळच्या जंगलात जमिनीत पुरला. पोलिसांनी आरोपी शानू पठाण (36 वर्षे), पुंकेश बोरकर (32 वर्षे), चंद्रशेखर गुज्जेवार (27 वर्षे), धनपाल मडावी (21 वर्षे), सर्व रा.जांभुळखेडा, आणि 5) सोनाली कंवर, रा.जेठकन्हार यांना बुधवारी (दि.४) अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.निरीक्षक शैलेंद्र ठाकरे हे करत आहेत.






