Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • लातूर महानगरपालिकेत ‘महिला राज’, काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे यांची महापौर पदी वर्णी
Top News

लातूर महानगरपालिकेत ‘महिला राज’, काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे यांची महापौर पदी वर्णी

Website 28
175

Latur Municipal Corporation Mayoral Election : लातूरच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येतेय. लातूर महापालिकेवर (Latur Municipal Corporation) पुन्हा एकदा काँग्रेसचा (Latur Municipal Corporation Congress majority) हात उंचावला असून, महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता महिला शक्तीच्या हाती सोपवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लातूर पालिकेवर महिला राज पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या (Congress and Vanchit Bahujan Aghadi Alliance) युतीने लातूरचा गड राखला असून, महापौरपदी जयश्री सोनकांबळे (Mayor Jayshree Sonkamble elected) तर उपमहापौरपदी स्नेहल उटगे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.

हेही वाचा – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर पलटी, वाहतूक कोंडीत प्रवाशी अडकले, राज ठाकरेंनी सरकारला सुनावले

शक्तीप्रदर्शन करत महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

​लातूर महापालिकेत आज सकाळी कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. काँग्रेसच्या सर्व विजयी उमेदवारांनी आणि शहर कार्यकारिणीच्या नेत्यांनी शक्तीप्रदर्शन करत महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. 70 पैकी तब्बल 43 जागा जिंकून काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे, तर सोबत असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या 4 उमेदवारांमुळे हे बहुमत आता अभेद्य झालंय.

विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला

महापालिका आवारात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि बँडच्या तालावर जोरदार जल्लोष केला.काँग्रेसचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जयश्री सोनकांबळे आणि स्नेहल उटगे या दोघांकडे शहराच्या विकासाची धुरा आल्याने महिला वर्गातही आनंदाचे वातावरण आहे.

​एकीकडे विरोधकांचे मनसुबे उधळून लावत काँग्रेसने आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे, तर दुसरीकडे वंचितसोबतच्या या युतीने भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी दिली आहे. आता या नव्या महिला जोडीच्या नेतृत्वात लातूर शहराचा कायापालट कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts