• Home
  • महाराष्ट्र
  • खाजगीकरणाच्या लाटेत केज जि.प. शाळा इतिहास जमा! प्रमोद महाजन, बजरंग सोनवणेंनी घेतले शिक्षण
Top News

खाजगीकरणाच्या लाटेत केज जि.प. शाळा इतिहास जमा! प्रमोद महाजन, बजरंग सोनवणेंनी घेतले शिक्षण

Kaij Zilla Parishad School is now a part of history

Kaij Zilla Parishad School is now a part of history : अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच दर्जेदार शिक्षण (Quality education) ही काळाची गरज बनली आहे. एका बाजूला खाजगी शाळांना पेव फुटलेला असताना दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळा इतिहास जमा होत आहेत. बीड सारख्या दुर्गम आणि साक्षरतेचे प्रमाण कमी (Low literacy rate) असलेल्या केज जिल्हा परिषदेची शाळा (Kaij Zilla Parishad School) शेवटच्या घटका मोजत आहे. विशेष म्हणजे याच शाळेत दिवंगत केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन, माजी खासदार अशोक पाटील आणि बीडचे सध्याचे खासदार बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonawane) यांनी याच शाळेतून शिक्षण घेतले असल्याचे माहिती माजी विद्यार्थ्यांनी (Former students) दिली आहे.

हेही वाचा – अजितदांदाशिवाय पहिली निवडणूक, सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्का

जिल्हा परिषद शाळेची स्थापना १९५२ मध्ये झाली, केजची ही शाळा केवळ शिक्षण संस्था नसून समाज घडवणारी एक संस्कारभूमी आहे. गेल्या ६८ वर्षांत या शाळेने एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना घडवले आहे. आज या शाळेचे विद्यार्थी केंद्रीय मंत्री, खासदार, आयुक्त, डॉक्टर, अभियंते, प्राध्यापक, शिक्षक तसेच विविध क्षेत्रांत उच्च पदावर कार्यरत आहेत. मात्र अलीकडील काळात खाजगी शाळांचे वाढते वर्चस्व आणि प्रशासनाचे दुर्लक्ष तसेच विद्यार्थ्यांविना ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

बीड जिल्ह्याचे खासदार यावर बोलायला तयार नाहीत

या शाळेला पुर्नजीवन देण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, गेंड्याची काताडे असलेलं प्रशासन आणि शासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. बीड जिल्ह्याचे खासदार यावर बोलायला तयार नाहीत. त्यामुळे राजकारण्यांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी मिळावे या हेतूने तर ही शाळा बंद पाडली गेली नाही ना? अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे.

‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’  चित्रपटाची पुर्नरावृत्ती

शाळेची दुरवस्था पाहून महाराष्ट्राच्या विविध भागांत असलेल्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आणि प्रजासत्ताक दिनी तब्बल ५०० माजी विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात एकत्र आले. ध्वजारोहणानंतर हातात फलक घेऊन त्यांनी जनजागृती फेरी काढली. सरकारी शाळा वाचवा, दर्जेदार शिक्षण मिळवा या घोषणांनी संपूर्ण केज शहर दणाणून गेले. मात्र, शासन आणि प्रशासन याकडे पाहिजे तेवढ्या तत्पर्यतेने लक्ष घालवायला तयार नाहीत. नुकतास प्रसिद्ध झालेल्या ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटाची पुर्नरावृत्ती केजमध्ये होताना दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts