The conspiracy to kill Ram’s seven sons : माळशिरस तालुक्यातून एक धक्कादायक राजकारणाचा अंक पुढे येत आहे. झेडपी निवडणुकीनंतर थेट राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला. असा दावा जयकुमार गोरे यांनी केला. तर आपल्या हप्त्याच्या कटाचा मास्टरमाईंड मोहिते पाटील असावेत. असा आरोप सातपुते यांनी केला. त्यामुळे माळशिरस मध्ये एक नावाच राजकीय अंक सुरू झालेला असून राम सातपुते विरूद्ध मोहिते पाटील संघर्षाला नवी धार मिळाली आहे.
हेही वाचा – राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, इंदापूरमधील एक हजार एकर जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यात राम सातपुते यांच्या पत्नीचा मोठा विजय झाला. या विजयामध्ये आमदार जानकर यांचे पुत्र तर धैर्यशील मोहिते पाटील यांचे बंधू अर्जुनसिंह यांचा पराभवही झाला. आणि याच नंतर राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेल्याची माहिती पुढे आली. याबाबत गेल्या काही दिवसापासून पोलीसही तपास करत असल्याचे खुद्द पालकमंत्री सांगत आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणासह पोलिसही तपास करत आहेत
एकीकडे सातपुते यांच्या हत्येच्या कटासंदर्भात माहिती पुढे येत असताना. दुसरीकडे मात्र माळशिरस तालुक्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले. यामध्ये राम सातपुते यांनी थेट अर्जुनसिंह आणि धैर्यशील मोहिते पाटील हेच मास्टरमाइंड असतील. असा आरोप केला. तसेच या प्रकरणाबाबत हा कॉन्ट्रॅक्ट केलिंगचा प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मेलेला काय मारायचे – उत्तम जानकर
माळशिरस तालुक्याच्या राजकारणात राम सातपुते विरुद्ध जानकर आणि मोहिते पाटील असं संघर्ष आहे. यामध्येच सातपुते यांच्या हत्येच्या कटासंदर्भात उत्तम जानकर यांनी मेलेला काय मारायचे.. अशा शब्दात टीका करत हे प्रकरण हसण्यावर नेले.
निमित्ताने राजकीय संघर्ष विकोपाला गेला
राम सातपुते यांच्या हत्येच्या कटासंदर्भात सर्वत्र चर्चा सुरू होत असताना. जयकुमार गोरे यांनी मात्र लवकरच पोलीस तपासात निष्पन्न होणार असल्याचे सांगितले. मात्र या निमित्ताने सातपुते विरुद्ध मोहिते पाटील अशा संघर्षाची धार अधिक झालेली या निमित्ताने दिसून आली. हप्त्याच्या कटासंदर्भात पोलीस तपास करून उलगडा करतीलच. मात्र राजकीय संघर्ष या निमित्ताने विकोपाला गेलेला अधिक तीव्रतेने दिसून येत आहे.












