Impersonator student : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary Education) २० फेब्रुवारीपासून दहावी परीक्षेला सुरुवात झाली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात शिक्षण विभागाला हादरून सोडणार घटना समोर आली आहे. मंगळवेळा येथील एकाच परीक्षा केंद्रावर (Mangalvedha Exam Center) तब्बल १० बोगस विद्यार्थी आढळून आले (10 bogus students found) आहेत. यामुळे शिक्षण विभागाचे धिंडवडे उडाले आहेत. हा प्रकार उघड झाला म्हणून ठिक मात्र असे १०-१० बोगस विद्यार्थी आढळत असतील तर, ही गंभीर बाब आहे. दहावीच्या परीक्षा महाराष्ट्रातील एकूण ५ हजार ११९ परीक्षा केंद्रांवर (5 thousand 119 examination center) घेतली जात आहे. त्यानुसार ही संख्या किती असेल ते देवालाच माहिती. मात्र. प्रकारामुळे एक मात्र नक्की झाले दहावीच्या परीक्षेमध्ये बहुसंख्ये बोगस विद्यार्थी असू शकतात.
हेही वाचा – बदलापूरात स्त्री बीजाची बेकायदा विक्री करणारे रॅकेट उघड; तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
ठिकाणी कॉपीच्या घटना उघडकीस आल्याने शासनाच्या कॉपीमुक्त अभियानास हरताळ फासण्यात आला आहे. भरारी पथकाकडून परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणावरुन विद्यार्थ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली. मात्र, मंगळवेढा येथील दहावीच्या परीक्षेत मराठी पेपरला चक्क 10 बोगस विद्यार्थी आढळून आले आहेत. या बोगस विद्यार्थ्यांवर केंद्रप्रमुखांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. मंगळवेढा तालुक्यातील बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदेश्वर येथे आज दहावीच्या परीक्षेत चक्क 10 बोगस विद्यार्थी आढळून आले आहेत. त्यामध्ये नऊ विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश आहे.
केंद्रसंचालक यांच्याकडून पोलिसांत तक्रार
मंगळवेढ्यातीलच सुतार इंटरनॅशनल स्कूल लक्ष्मी दहिवडी या शाळेतील विद्यार्थी नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालयात परीक्षेसाठी होते. परीक्षा सुरू करताना सर्व विद्यार्थ्यांची ओळखपत्र तपासणी दरम्यान दहा बोगस विद्यार्थी आढळून आले आहेत. या दहा विद्यार्थ्यांवर केंद्र प्रमुखांनी बोर्डाच्या नियमानुसार कारवाई करीत रीतसर पोलीस तक्रार दिली आहे, अशी माहिती केंद्रसंचालक विठ्ठल एकमल्ली यांनी दिली.
मृत ग्रामसेवकाचे नाव 10 वी परीक्षेच्या पथकात
बीडमध्ये दहावी आणि बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षे दरम्यान शिक्षण विभागाचा गलथान कारभार वारंवार समोर येतोय. 2021 साली आजारपणामुळे निधन झालेल्या ग्रामसेवक अरविंद आगलावे यांच्यावर बैठे पथकाची जबाबदारी देण्यात आली. गटशिक्षण अधिकारी समंदरखान यांनी याबाबतची ऑर्डर इश्यू केली आहे. मात्र, या बैठे पथकात पाच वर्षांपूर्वी निधन झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आल्यानं शिक्षण विभागाबाबत आश्चर्य आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातोय.





