Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • विदर्भात काँग्रेसला मोठधक्का; वारजुकर कुटुंबाचा सामूहिक राजीनामा
Top News

विदर्भात काँग्रेसला मोठधक्का; वारजुकर कुटुंबाचा सामूहिक राजीनामा

Congress Party Chandrapur

Chandrapur Congress : चिमूर विधानसभा मतदारसंघात (Chimur Assembly Constituency) काँग्रेसला खिंडार पडले असून, जिल्ह्याचे (Congress Party Chandrapur) वजनदार नेतृत्व मानल्या जाणाऱ्या वारजुकर कुटुंबाने (Dr. Avinash Warjukar) काँग्रेसला रामराम ठोकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या भेटीनंतर वारजुकर कुटुंबाने आपला सामूहिक राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला आहे.

हेही वाचा – रोहित पवार आक्रमक! व्हिएसआर कंपनीविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पवार कुटुंब बारामती पोलिस ठाण्यात ठिय्या..

चिमूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, काँग्रेसचे विधानसभा समन्वयक डॉ. सतीश वारजुकर आणि युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साईश वारजुकर यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अनेक दशकांपासून काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या या कुटुंबाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वारजुकर कुटुंब हे काँग्रेसचे निष्ठावान मानले जात होते. त्यांच्या जाण्याने चिमूरमध्ये काँग्रेसची संघटनात्मक बांधणी खिळखिळी होण्याची शक्यता आहे.

साईश वारजुकर हे युवक काँग्रेसचे महत्त्वाचे चेहरे होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील तरुण फळीवर याचा मोठा परिणाम होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर हा निर्णय झाल्याने, लवकरच हे कुटुंब भाजपमध्ये प्रवेश करेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारजुकरांचे हे ‘बंड’ काँग्रेससाठी चिमूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात किती महाग पडणार, हे येणारा काळच ठरवेल.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts