Rohit Pawar Hunger Strike in Pandharpur : राज्याच्या राजकारणात आणि विशेष म्हणजे विठूरायाच्या पंढरपूरात घडामोडींना मोठा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे शेतकऱ्यांची विनाअट कर्जमाफी करावी, आणि कर्ज वसुली त्वरीत थांबवावी या मागमीसाठी अन्नत्यात आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. मात्र, पोलिसांनी वाहतूक कोंडीचे कारण देत रोहित पवार आणि शेतकरी येणारे सर्व रस्ते जाम करून टाकले आहेत. तर दुसऱ्या बाजूला रोहित पवार देखील आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहेत.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पंढरपुरात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वात अन्नत्याग आंदोलन होतंय. मात्र, रोहित पवारांच्या आंदोलनाचा सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्याच पक्षातील आमदारांना निरोप नाहीये. शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर आणि आमदार अभिजीत पाटलांनी आंदोलनाबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचं सांगितलं आहे. सोलापूर जिल्ह्यात शरद पवार पक्षाचे चार आमदार आणि एक खासदार आहे. आमदारांना निरोप नसल्याची थेट दोन आमदारांनी कबुली देखील दिली. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नाही. त्यामुळे आता हे आंदोनल होणार की, दाबले जाणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पोलिसांकडून आमदार रोहित पवारांना नोटीस
आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांकडून आमदार रोहित पवारांना नोटीस देण्यात आली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि शिवाजी महाराज चौकातील वाहतूक व्यवस्थेचे कारण दाखवत पोलिसांकडून ही नोटीस बजावण्यात आली. नगरपालिकेने इतर मोकळ्या जागेत आंदोलन करण्याचे सुचवले होते. मात्र, रोहित पवार त्यांच्या निर्णयावर ठाम होते. तर पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आंदोलनावरून नोटीस देण्यात आली.
विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही सरकार बॅरीकेट्स लावून आमच्या मार्गात असे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय… त्यामुळं अन्नदात्यासाठीच्या अन्नत्याग आंदोलनात कितीही अडथळे आणले… pic.twitter.com/jwXJS26zCQ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2026
रोहित पवारांकडून सोशल मिडियावर पोस्ट शेअर
ही नोटीस आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनापूर्वी पोलिसांकडून देण्यात आली. यादरम्यानच रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. रोहित पवार यांनी लिहिले की, विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही सरकार बॅरीकेट्स लावून आमच्या मार्गात असे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय.
कितीही अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही
त्यामुळे अन्नदात्यासाठीच्या अन्नत्याग आंदोलनात कितीही अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही. सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर कधीही टिकत नसतो, हे सरकारने लक्षात ठेवावं. उलट लढणाऱ्याचे हात धरुन आणि बोलणाऱ्याचं तोंड दाबून सरकार स्वतःचाच पराभव सिद्ध करतंय. पण एक मात्र खरंय, की सरकारच्या दबावामुळं जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडून आमच्या मार्गात अडथळे आणले जात असले तरी मनाने मात्र प्रशासनातील सर्वजण आमच्यासोबत आहे, हे सरकारने विसरु नये!












