Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • अरिजीत सिंगनंतर आता श्रेया घोषालही गाण्यातून घेणार ब्रेक? स्वत:च कारण देत म्हणाली, “जोपर्यंत माझा आवाज…”
Top News

अरिजीत सिंगनंतर आता श्रेया घोषालही गाण्यातून घेणार ब्रेक? स्वत:च कारण देत म्हणाली, “जोपर्यंत माझा आवाज…”

Shreya Ghoshal | काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने (Arijit Singh) पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने हा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. अरिजीत सिंगने त्यांच्या उत्कृष्ट अशा आवाजाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. पण त्याने गाण्यातून अचानक ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. तर आता अरिजीतनंतर लोकप्रिय गायिका श्रेया घोषालनेही (Shreya Ghoshal) गाण्यातून निवृत्ती घेण्याबाबत संकेत दिले आहेत.

हेही वाचा – KD: The Devil चित्रपटातील नवीन गाणं रिलीज, नोरा फते आणि संजय दत्तचा धमाकेदार डान्स

श्रेया घोषाल गाण्यातून निवृत्ती घेण्याबाबत काय म्हणाली?

श्रेया घोषालने नुकतीच एक मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये श्रेयाने सांगितले की, स्टेजवर लाइव्ह गाणं गाण्याऐवजी लिप-सिंक करून गाणं सादर करणं मला अजिबात पटत नाही. जर माझ्यावर भविष्यात असं काही करण्याची वेळ आली तर मी गाणंच बंद करेन. कारण लाइव्ह परफॉर्म करणं हे प्रत्येक गायकासाठी खूप महत्त्वाचं असतं, असं श्रेया म्हणाली.

लिंप-सिंक करणं ही गोष्ट मला खूप विचित्र वाटते. जोपर्यंत माझा आवाज व्यवस्थित आहे आणि रोज माझा गाण्याचा सराव सुरू आहे, तोपर्यंत मला स्टेजवर उभं राहून प्रेक्षकांसाठी लाइव्ह गाणं गायला नेहमीच आवडेल. पण ज्या दिवशी माझ्यावर लिप-सिंक करायची वेळ येईल तेव्हा मी गाणं गायचं बंद करेन, असंही श्रेयाने म्हटले आहे.

अरिजीत सिंगच्या निर्णयाचं श्रेयाने केलं कौतुक

पुढे श्रेयाने अरिजीत सिंगच्या निर्णयावर भाष्य केलं. ती म्हणाली की, असे निर्णय घेताना खूप धाडस लागते. अरिजीतने खूप धैर्याने हा निर्णय घेतला असून मी त्याच्या निर्णयाचा खूप आदर करते. कारण तो कधीही आपण संगीत का करत आहोत, त्यातून आपल्याला काय मिळेल? याचा तो कधीही विचार करत नाही. ज्या कामातून अरिजीतला आनंद मिळतो ते काम तो करतो. संगीत हे आरिजीतसाठी खूप मोठं आहे, त्यामुळेच लोक त्याच्यावर खूप प्रेम करतात. कधी कधी मला देखील गाण्यातून ब्रेक घ्यावा वाटतो, असं श्रेया म्हणाली.

संगीत हे आम्हाला प्रत्येक समस्येतून, दु:खातून बाहेर पडण्यास मदत करते. एक कलाकार म्हणून आपल्या वैयक्तिक आयुष्यात काहीही सुरू असले तरी त्या गोष्टीचा परिणाम स्टेजवर दिसता कामा नये. तसेच प्रेक्षकांकडून मिळणारे भरभरून प्रेमच आम्हाला पुन्हा पुन्हा गाणं गाण्यासाठी प्रेरणा देते, असंही श्रेया म्हणाली.

दरम्यान, श्रेया घोषाल ही प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. तिनं हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये अप्रतिम अशी गाणी गायली आहेत. तिच्या मधुर आवाजानं तिने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग लाखोंच्या संख्येत आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts