Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • घरबसल्या LPG बायोमेट्रिक eKYC कसे करावे? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस
ताज्या बातम्या

घरबसल्या LPG बायोमेट्रिक eKYC कसे करावे? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

LPG eKYC

LPG Biometric eKYC Process: आता घरगुती एलपीजी धारकांसाठी बायोमेट्रिक eKYC बंधनकारक केले आहे. घरबसल्या तुमच्या फोनवर LPG बायोमेट्रिक eKYC पूर्ण करू शकता आणि सबसिडी सुरक्षित ठेवा. चला तर जाणून घेऊयात घर बसल्या ऑनलाईन स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस कशी करावी.

हेही वाचा: Oscars 2026: ऑस्करमध्ये प्रियंका-निकचा ग्लॅमरस लूक; मंगलसूत्र आणि सांपाच्या हाराने वेधले लक्ष!

सरकारने सर्व घरगुती एलपीजी (LPG) ग्राहकांसाठी बायोमेट्रिकआधार ऑथेंटिकेशन (eKYC) बंधनकारक केले आहे. यामुळे सबसिडी थेट योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि LPG गॅसची काळाबाजारी टाळता येईल. या प्रक्रियेसाठी तुम्हाला गॅस एजन्सीकडे जावे लागणार नाही, कारण आता घरबसल्या संपूर्ण प्रक्रिया फोनवरून करता येईल. यासाठी गॅस कंपनीचे मोबाइल अ‍ॅप आणि Aadhaar FaceRD अ‍ॅप लागेल.

ईकेवायसी अनिवार्य आहे का?

केंद्र सरकारने देशातील सुमारे ३३ कोटी घरगुती गॅस ग्राहकांसाठी ईकेवायसी अनिवार्य केले आहे. यामुळे गॅस पुरवठा पारदर्शक होण्याची शक्यता आहे. सबसिडी थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल. तसेच ग्राहकांना पैसे घेण्यासाठी एजन्सीमध्ये जाण्याची गरज नाही.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या ट्विटनुसार, हीच प्रक्रिया विशेषतः प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या १०.५ कोटींहून अधिक लाभार्थ्यांसाठी अनिवार्य आहे, जेणेकरून त्यांना सबसिडी मिळत राहील. किंवा लाभार्थ्यांना दरवर्षी एकदा ऑनलाइन ईकेवायसी पडताळणी करणे आवश्यक आहे.

एलपीजी दरवाढ आणि सरकारचे उद्दिष्ट

काल एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर ६० रुपयांची वाढ झाली.

यामागाचीची मुख्य कारणे:

मध्य पूर्वेतील संघर्ष

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेल आणि गॅस पुरवठा विस्कळीत

सरकार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य करते, जेणेकरून गॅसचा काळाबाजार टाळता येईल आणि प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित गॅस पोहोचेल.

घरबसल्या ई-केवायसी (eKYC) कसे करावे

१. ॲप इंस्टॉल करा ( Pradhan Mantri Ujjwala Yojana app)

तुमच्या गॅस कंपनीचे ॲप आणि आधार फेसआरडी (Aadhaar FaceRD) ॲप इंस्टॉल करा.

२. गॅस कंपनीच्या ॲपमध्ये लॉगिन करा:

ॲप उघडा आणि तुमच्या गॅस कनेक्शनसोबत नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून लॉगिन करा.

३. ई-केवायसी / री-केवायसी (eKYC / Re-KYC) निवडा:

उपलब्ध मेनू किंवा सर्व्हिस सेक्शनमध्ये जाऊन आधार ई-केवायसी (Aadhaar e-KYC) किंवा री-केवायसी (Re-KYC) वर क्लिक करा.

नियम स्वीकारा आणि चेहरा ओळखण्यासाठी पुढील पायरी सुरू करा.

४. तुमचा चेहरा स्कॅन करून घ्या:

आधार फेसआरडी (Aadhaar FaceRD) ॲप आपोआप उघडेल.

तुमच्या फोनच्या फ्रंट कॅमेऱ्याचा वापर करून तुमचा चेहरा स्कॅन करा.

स्कॅन करण्यासाठी तुम्हाला डोळे मिचकावावे लागतील.

५. ई-केवायसी सबमिट करा:

स्कॅन केल्यानंतर, तुमचा आधार तपशील स्क्रीनवर दिसेल.

सबमिट बटणावर क्लिक करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts