Mouni Roy | मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयचा (Mouni Roy) चार वर्षांचा संसार तुटणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. तसेच मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नंबियार (Suraj Nambiar) यांच्यात घटस्फोट होणार का? असा सवालही सध्या उपस्थित केला जात आहे. मौनी रॉयने अचानक तिचा पती सूरज नंबियारला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा – “10 कोटी दे नाहीतर…”, एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी, कोण आहे धमकी देणारा मास्टरमाइंड?
मौनी रॉय आणि सूरज नंबियारच्या नात्यात दुरावा?
मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नंबियार यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचं म्हटलं जात आहे. कारण मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे, ज्यामुळे विविध चर्चांना सुरूवात झाली आहे.
मौनी रॉयच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या यादीतून पती सूरज नंबियारचे नाव गायब झाल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. मौनी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तसेच ती दररोज नवनवीन पोस्ट शेअर करत असते. पण मागील काही दिवसांपासून तिने पती सूरजसोबतचे कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केलेले नाहीयेत. दुसरीकडे सूरजने देखील मौनीला अनफॉलो केलं असून त्याने देखील तिच्यासोबतचा एकही फोटो मागील काही दिवसांपासून पोस्ट केलेला नाहीये. त्यामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. मौनी आणि सूरजने एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून त्या दोघांमध्ये घटस्फोट होणार का? असा सवाल चाहते उपस्थित करत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांनी दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर जानेवारी 2022 मध्ये लग्न केले होते. त्यांनी गोव्यामध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर मौनीने सूरजसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. तर मार्च 2025 पर्यंत ते एकत्र दिसत होते मात्र गेल्या वर्षभरात त्यांनी एकत्र एकही फोटो पोस्ट केलेला नाहीये त्यामुळे त्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं म्हटलं जात आहे.







