IPL 2026 Google Doodle: गूगलचं आजचं निऑन डूडल पाहून अनेकांच्या मनात एकच प्रश्न हे डूडल IPL साठीचं तर नाही ना? स्टेडियमसारखा माहोल आणि लाईव्ह परफॉर्मन्सचा vibe पाहून चर्चा रंगली आहे.
गूगलने (google( आज सादर केलेलं निऑन-थीम डूडल (Neon-themed doodle) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या डूडलमध्ये दिसणारे चमकदार लाईट्स, मायक्रोफोन आणि स्टेजसारखी रचना पाहून अनेकांनी याचा संबंध थेट IPLशी जोडला आहे.
विशेष म्हणजे, या डिझाइनमध्ये दिसणारा माहोल हा एखाद्या लाईव्ह स्टेडियम इव्हेंटसारखा वाटतो. IPL सामने सुरू असताना अशा प्रकारचा उत्साह, लाईट्स आणि परफॉर्मन्स नेहमीच पाहायला मिळतो. त्यामुळे अनेक नेटिझन्सना हे डूडल क्रिकेटच्या या मोठ्या लीगसाठीच बनवलं असावं असं वाटत आहे.
तथापि, गूगलकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे डूडल नेमकं IPLसाठी आहे की संगीत आणि मनोरंजन क्षेत्रासाठी, याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर मात्र याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. काही जण याला “IPL vibe डूडल” म्हणत आहेत, तर काहींना हे संगीताच्या दुनियेचं सेलिब्रेशन वाटत आहे.
एकूणच, गूगलचं हे डूडल नेहमीप्रमाणे लोकांचं लक्ष वेधून घेत असून, त्यामागचं कारण काहीही असलं तरी त्याने निर्माण केलेली उत्सुकता मात्र नक्कीच वाढली आहे.












