IAF Plane Crash Assam: आसामच्या जोरहाद येथे लँडिंगदरम्यान भारतीय हवाई दलाचे AN- ३२ विमान क्रॅश झाले. या भीषण अपघातात पाच जवान शहीद झाले असून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
आसाममधील जोरहाद येथे शनिवारी (१३ जून, २०२६) भारतीय हवाई दलाचे (IAF) एक AN-३२ परिवहन विमान लँडिंगच्या वेळी क्रॅश झाले. या भीषण अपघातात पाच जवान शहीद झाले असून हवाई दलाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा: वारंवार डोकेदुखीचा त्रास होतोय? दुर्लक्ष करू नका, हा गंभीर आजाराचा संकेत असू शकतो
लँडिंगवेळी काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ४३ स्क्वाड्रनचे AN-३२ विमान (aircraft accident) रोवरिया परिसरातील हवाई दलाच्या तळावर उतरत असताना हा अपघात घडला. विमानात माल भरलेला होता. अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाले आणि त्यानंतर आग लागल्याचेही सांगितले जाते.
शहीद जवानांची ओळख जाहीर
IAF ने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा तसेच अग्निवीर खेमाराम कुमावत आणि दानिश आलम यांना वीरमरण आले. या कठीण प्रसंगी हवाई दल त्यांच्या कुटुंबीयांसोबत ठामपणे उभे असल्याचे सांगण्यात आले आहे.
The Indian Air Force deeply regrets the loss of five personnel in the An-32 accident at Jorhat, Assam.
Sqn Ldr Prashant Singh, Flt Lt Shubham Kumar, Sgt Jitendra Sharma, Agniveervayu Khemaram Kumawat and Agniveervayu Danish Alam made the supreme sacrifice in the line of duty.… pic.twitter.com/9SmOjtS5mU
— Indian Air Force (@IAF_MCC) June 13, 2026
या अपघातात कोण वाचले
या दुर्घटनेत को- पायलट वाचले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघातानंतर हवाई दलाने कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे.
संरक्षणमंत्र्यांकडून शोक व्यक्त
रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी देश ठामपणे उभा असल्याचे सांगितले.
AN-32 विमानाविषयी माहिती
सोविएत बनावटीचे AN-32 हे ट्विन- इंजिन टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट विमान आहे. कठीण भौगोलिक परिस्थिती आणि डोंगराळ भागांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाते. विशेषतः ईशान्य भारत आणि हिमालयीन भागात हे विमान महत्वाची भूमिका बाजवते.
यापूर्वीही घडले आहेत अपघात
या विमानाशी संबंधित काही मोठ्या दुर्घटना यापूर्वीही घडल्या आहेत. जून २०१९ मध्ये अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथे जाणारे AN – ३२ विमान बेपत्ता झाले होते. मोठ्या शोध मोहिमेनंतर त्याचे अवशेष सापडले आणि सर्व १३ जणांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. तसेच जुलै २०१६ मध्ये चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला जाणारे विमान बंगालच्या उपसागरात बेपत्ता झाले होते, ज्यात 29 जण होते. अनेक वर्षांच्या शोधानंतरही ते सापडू शकले नाही.







