Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • ‘माझ्याकडून चूक झाली…’ ३७० रुपयांच्या बिर्याणी वादावर प्रणित मोरेंनी पुन्हा मागितली माफी; म्हणाला-
Top News

‘माझ्याकडून चूक झाली…’ ३७० रुपयांच्या बिर्याणी वादावर प्रणित मोरेंनी पुन्हा मागितली माफी; म्हणाला-

Pranit More Apology

Pranit More Apology: ३७० रुपयांच्या बिर्याणी वादात स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वाढत्या टीका आणि कायदेशीर कारवाईदरम्यान त्यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत पुन्हा माफी मागितली आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं काय म्हणाला.

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे ३७० रुपयांच्या बिर्याणी वादामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. प्रकरणावरून वाढलेल्या टीका आणि कायदेशीर कारवाईदरम्यान त्यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे. या वादामुळे सोशल मीडियावर मोठा खळबळ उडाला असून महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! आसामच्या जोरहाटमध्ये IAF विमान क्रॅश; 5 जवान शहीद; लँडिंगवेळी नेमकं काय घडलं?

वाद वाढल्यानंतर पुन्हा माफी

प्रणित मोरे यांच्या शोमधील एका व्हायरल व्हिडिओनंतर हा वाद सुरू झाला होता. याआधीही त्यांनी माफी मागितली होती, मात्र प्रकरण शांत न झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा सार्वजनिकरित्या जाहीर माफी मागितली आहे.

मी पटकन बोलून गेलो होतो- प्रणित मोरे

व्हिडिओमध्ये बोलताना प्रणित मोरे म्हणाले की, त्या प्रसंगी ते योग्य- अयोग्य यातील फरक ओळखू शकले नाहीत. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेमुळे ते स्वतःही हरहुन गेले आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, त्या घटनेत झालेल्या चुकांसाठी ते पूर्णपणे जबाबदारी स्वीकारतात आणि ज्या लोकांना दुखापत झाली आहे. त्यांच्यासाठी ते मनापासून माफी मागतात.

“मी चांगला माणूस बनून दाखवेन”

प्रणित यांनी सांगितले की ते आता आपल्या कंटेंट आणि कामावर अधिक जबाबदारीने लक्ष देतील. भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी ते स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील आणि अधिक चांगला माणूस बनून दाखवतील, असेही त्यांनी नमूद केले.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

प्रणित मोरे यांच्या शोमधील एका व्हायरल क्लिपमुळे हा वाद सुरू झाला. त्यामध्ये एक तरुण आपला वैयक्तिक अनुभव सांगताना आणि आक्षेपार्ह वक्तव्ये करताना दिसला होता. हीच क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

अनेक सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी या विषयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचप्रमाणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टँडअप कॉमेडीमध्ये शिस्त राखण्याची गरज व्यक्त केली आहे.

कायदेशीर कारवाई सुरू

या प्रकरणात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, कायदेशीर कारवाईनंतर संबंधित व्यक्तीची नोकरी गेल्याची माहिती समोर आली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts