Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • PM किसान लाभार्थ्यांनो सावधान! ई-केवायसी न केल्यास अडकू शकतात 2,000 रुपये; 23वा हप्ता कधी येणार?
Top News

PM किसान लाभार्थ्यांनो सावधान! ई-केवायसी न केल्यास अडकू शकतात 2,000 रुपये; 23वा हप्ता कधी येणार?

PM Kisan Scheme
52

PM Kisan Scheme: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे. ३० जूनपूर्वी ई-केवायसी पूर्ण न केल्यास पुढील २,००० रुपयांचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे २३ वा हप्ता कधी जमा होणार आणि ई- केवायसीची प्रक्रिया कशी पूर्ण करायची, हे जाणून घेणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. योजनेअंतर्गत आर्थिक मदत नियमितपणे मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी ३० जून २०२६ पूर्वी ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीत ई- केवायसी न केल्यास पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

हेही वाचा: तासन्‌तास स्क्रोलिंग करताय? सोशल मीडियाच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

ई-केवायसी का आहे आवश्यक?

केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना रोखण्यासाठी ई- केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे योजनेचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल, असा सरकारचा उद्देश आहे.

ई-केवायसी कशी पूर्ण कराल?

शेतकरी दोन पद्धतींनी ई- केवायसी करू शकतात.
तुम्ही जवळच्या CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पडताळणीद्वारे प्रक्रिया पूर्ण करता येते.
‘PM-KISAN’ मोबाईल अॅपच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशन वापरूनही ई-केवायसी करता येते.

विशेष लाभार्थ्यांसाठी सुविधा

वृद्ध दिव्यांग किंवा आजारी शेतकऱ्यांना केंद्रावर जाणे शक्य नसल्यास ग्रामस्तरीय अधिकारी आणि संबंधित कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करणार आहेत.

आतापर्यंत किती हप्ते मिळाले?

PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये तीन सामान हप्त्यांमध्ये दिले जातात. फेब्रुवारी २०१९ पासून आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात २२ हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे.

आता २३ व हप्ता कधी मिळणार?

२२ वा हप्ता मार्च २०२६ मध्ये वितरित करण्यात आला होता. साधारणपणे प्रत्येक हप्त्यामध्ये सुमारे चार महिन्यांचे अंतर ठेवले जाते. त्यामुळे २३ वा हप्ता जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबतही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

शेतकऱ्यांनी कोणतीही अडचण टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts