Uddhav Thackeray Called MPs Meeting at Matoshree: राजकीय हालचालींना वेग आला असून आज १४ जून रोजी उद्धव ठाकरे यांची खासदारांसोबत मातोश्रीवर महत्वाची बैठक होणार आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात चर्चाना उधाण आले असताना ही बैठक विशेष महत्वाची मानली जात आहे. आगामी राजकीय रणनीती, पक्षाची भूमिका आणि संघटनात्मक निर्णय यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील सर्व खासदारांना मुंबईत उपस्थिती राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा: लाडकी बहीण योजनेत मोठा झटका! हजारो महिलांचा लाभ धोक्यात…
शिवसेना (UBT) कडून लोकसभेतील खासदारांची संख्या नऊ असून, या सर्व खासदारांच्या उपस्थितीकडे विशेष लक्ष आहे. मागील काही दिवसांपासून काही खासदार पक्ष बदलण्याच्या चर्चाही सुरू असल्याने आजच्या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, खासदार संजय जाधव यांच्या अनुपस्थितीबाबत याआधीही चर्चा झाली होती. ते आजच्या बैठकीत उपस्थित राहणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी या बैठकीवर टीका करत पक्षातील अस्थिरतेचे संकेत दिल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे, काही नेत्यांनी ‘ ऑपरेशन टायगर’ ही केवळ राजकीय चर्चा असल्याचे म्हटले आहे.
शिवसेना (UBT) लोकसभा खासदारांची यादी
संजय देशमुख, यवतमाळ
नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली
संजय जाधव, परभणी
राजाभाऊ वाजे, नाशिक
अरविंद सावंत, दक्षिण मुंबई
अनिल देसाई, मुंबई दक्षिण-मध्य
संजय दीना पाटील, मुंबई उत्तर-पूर्व
भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी
ओमराजे निंबाळकर, धाराशिव
राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक किती निर्णायक ठरणार आणि कोणते नवे संकेत मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











