Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ऑपरेशन टायगर, लांडगा राहिले बाजूला, फडणवीसांकडून ‘ऑपरेशन लोटस’ सुरू
राजकारण

ऑपरेशन टायगर, लांडगा राहिले बाजूला, फडणवीसांकडून ‘ऑपरेशन लोटस’ सुरू

Operation Lotus Maharashtra

Operation Lotus Maharashtra : पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सभामंडप आणि कलशारोहण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. मात्र, या सर्वांपेक्षा अधिक चर्चा ठाकरे गटाच्या (Thackeray Shivsena) एका निष्ठावंत आमदाराची (Babaji Kale) रंगली आहे. या निष्ठवंत पदाधिकाऱ्याची निष्ठा पाहून देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या नेत्याला थेट स्टेजवरच आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा फोडफोडीची चर्चा सुरु झाली आहे.

मात्र, हा निष्ठावंत आमदार नेमका कोण आहे? आणि १३२ आमदार असलेल्या भाजपला या निष्ठावंत आमदाराची कोणती गोष्ट एवढी भोवली की, थेट मुख्यमंत्र्यांना स्टेजवर स्वतःला आवर घालता आला नाही. बाबाजी काळे हे निष्ठावंत आमदार खेड-आळंदी मतदार संघाचे विधानसभा सदस्य आहेत. त्यांनी अजित पवार गटाच्या दिलीप मोहिते यांच्या ५० हजारांहून अधिक मतांनी पराभव केलाय. सधा जिल्हा परिषद सदस्य असलेला हा कार्यकर्ता विधानसभेला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करून दाखवलं.

हेही वाचा – ‘टायगर Vs लांडगा’! उद्धव ठाकरेंच्या बैठकीला किती खासदार गैरहजर, वाचा सविस्तर…

आम्ही बाबाजी काळे यांना आधीच मोठं प्रपोजल दिलं आहे – फडणवीस

भीमाशंकर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला स्थानिक प्रतिनिधी म्हणून ठाकरे गटाने आदार बाबाजी काळे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर फोटो काढण्यासाठी नेते मंडळी एकत्र आले होते. त्यावेळी फडणवीस म्हणाले, आता फोटो काढण्याची गरज नाही, आम्ही बाबाजींना आधीच एक मोठं प्रपोजल दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रपोजल हा शब्द उच्चारल्याने उपस्थितीतांचे कान एकदम टवकारले.

हसतमुखाने केलेलं हे विधान असलं तरी, त्यामागे राजकीय संकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितांसमोर हसतमुखाने केलेलं हे विधान असलं तरी, त्यामागे राजकीय संकेत मिळत होते. त्यांचे हे प्रपोजल कशाचे आहे हे न समजण्या इतपत सध्या तरी नेते मंडळी नाहीत. मात्र, आता हाच खरा प्रश्न पडलाय की? बाबाजी काळे मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रपोजल स्विकारणार की, आपली निष्ठा कायम ठेवणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यातच सध्या राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन लांडगा यांसारखी फोडाफोडीची विधाने केली जात आहेत.

ऑपरेशन लोटस तर नाही ना राबवणार, असा कयास लावला जात आहे

दरम्यान, या दोन्ही ऑपरेशनच्या मध्ये भाजप आपलं ऑपरेशन लोटस तर नाही ना राबवणार, असा कयास राजकीय विश्लेषक लावत आहेत. कारण फडणवीसांचे राजकारण असेच राहिले आहे. ‘कही पे निगाहें और कही पे निशाना’ त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts