Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • रस्ताच ठरला मृत्यूचे कारण! वैद्यकीय मदतीअभावी प्रसूतीनंतर महिलेचा दुर्दैवी अंत
ताज्या बातम्या

रस्ताच ठरला मृत्यूचे कारण! वैद्यकीय मदतीअभावी प्रसूतीनंतर महिलेचा दुर्दैवी अंत

Chandrapur District

Tragic Maternal Death Reported in Chandrapur District: चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. योग्य वेळी वैद्यकीय मदत उपलब्ध न झाल्याने प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आणि मूलभूत पायाभूत सुविधांबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्मण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिवती तालुक्यातील एका दुर्गम गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेची अकाली प्रसूती घरीच झाली. प्रसूतीनंतर तिची प्रकृती अचानक बिघडली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. कुटुंबीयांनी तातडीने वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधला. मात्र गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत खरा असल्याने रुग्णवाहिकेला घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्या.

हेही वाचा: बुधवारी ग्रहांचा मोठा फेरबदल! ‘या’ राशींचे नशीब उजळणार, करिअर आणि आर्थिक लाभाचे संकेत

वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्याने महिलेची प्रकृती अधिकच गंभीर बनली आणि अखेर तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हलगाल व्यक्त केली जात असून ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, संबंधित महिलेची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत होती. तसेच प्रसूतीपूर्वी काळात तिला आरोग्य केंद्राजवळ राहण्याचा किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्लाही देण्यात आला होता. मात्र काही कारणांमुळे ती गावातच राहिली होती.

आरोग्य विभगाने नागरिकांना गर्भावस्थेदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच दुर्गम भागांतील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचेही सांगितले आहे.

ग्रामस्थांकडून संताप

या घटनेनंतर स्थनिक नागरिकांनी गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपत्कालीन परिस्थितीतही रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याने दुर्गम भागातील नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था, रस्ते आणि आपत्कालीन सेवांच्या उपलब्धतेबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts