Work From Camel Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक तरुण उंटावर बसून लॅपटॉपवर ऑफिसची ऑनलाइन मीटिंग अटेंड करताना दिसत आहे
‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना आता जुनी होत चाली असून सोशल मीडियावर सध्या ‘वर्क फ्रॉम एनीवेअर’ चा एक भन्नाट नमुना चर्चेत आला आहे. वाळवंटाच्या मध्यभागी उंटावर बसून लॅपटॉपवर ऑफिसची ऑनलाईन मीटिंग अटेंड करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
कडक उन्हात, आजूबाजूला फक्त वाळूचे ढिग आणि त्यामध्ये उंटावर बसून काम करणारी ही व्यक्ती पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी या व्हिडिओला ‘ वर्क फ्रॉम होमचा पुढचा टप्पा’ असे म्हटले आहे.
हेही वाचा : न्यायालयाचे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याच्या सुरक्षेला प्राधान्य, कौटूंबिक भेटीला स्थगिती
उंटावरूनच ऑनलाईन झूम कॉल
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वाळवंटातून उंटावर प्रवास करत असताना लॅपटॉपवर झूप मीटिंगमध्ये सहभागी झालेली दिसते. कार्यालय किंवा घराऐवजी थेट उंटावर बसून काम करणारा हा कर्मचारी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
व्हिडिओमध्ये तो अगदी शांतपणे आपल्या कामात व्यक्त दिसतो. त्याच्या मागे दूरवर पसरलेले वाळवंट आणि समोर लॅपटॉप असा अनोखा नजारा पाहायला मिळतो.
सोशल मीडियावर व्हिडिओची जोरदार चर्चा
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच लाखो लोकांनी तो पहिला. व्हिडिओसोबत लिहिलेल्या मजेशीर कॅप्शनने अनेकांचे लक्ष घेतले. “POV: तुम्ही बॉसला सांगता की तुम्ही वर्क फ्रॉम होम करत आहात,” असे कॅप्शन व्हिडिओवर देण्यात आले होते.
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी अनेक मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिले, “आता उंटाच्याही परफॉर्मन्सचा आढावा घेण्यात येईल का?”
दुसऱ्या एका युजरने प्रश्न विचारला, “वाळवंटात एवढं चांगलं इंटरनेट कसं मिळालं?”
तर काहींनी हा अनुभव ‘ड्रीम वर्कस्पेस’ असल्याचे म्हटले. काहींनी मात्र विनोद करत, “इतक्या उन्हात लॅपटॉप आधी बंद पडेल की मीटिंग?” अशी टिप्पणी केली.
या अनोख्या व्हिडिओने इंटरनेटवर हशा पिकवला असून ‘वर्क फ्रॉम होम’ची व्याख्या किती बदलली आहे, याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.





