Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेला येणार महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
Top News

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेला येणार महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

Heavy Rain in Maharashtra

Heavy Rain in Maharashtra : सध्या १५ जून उलटून गेला तरी राज्यात दाखल होणाऱ्या मॉन्सूनचा पत्ता नाही. त्यानंतर आता भारतीय हवामान विभागाकडून 20 जूनपर्यंत मुंबईसह राज्यात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपूष्ठात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, सध्याची स्थिती पाहता राज्यात 29 जूनलाही मॉन्सून दाखल होण्याची शक्यता कमीच आहे. मॉन्सून सध्या स्थितीला अजूनही आहे, तशाच स्थितीत आहे. त्यामुळे हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरणार का? आणि शेती कामाला वेग येणार का? हे देखील पाहाणं तेवढचं महत्त्वाचं ठरणार आहे.

अफगाणिस्तानच्या दिशेने आलेल्या वाऱ्यामुळे मॉन्सूनला अडथळा निर्माण होत आहे. मॉन्सून अरबी समुद्रात असून पुढे सरकत नाही. हीच स्थिती पुढील 3 ते 4 दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याची मॉन्सूनची वाटचाल पाहत राज्यात मॉन्सून 20 जूनला देखील दाखल होण्याची शक्यता कमी आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला. एल निनो सक्रिय असल्याने स्थिती अधिक गंभीर आहे.

मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव पडण्याची शक्यता

राज्यातील मॉन्सूनवर या एल निनोचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. जगभरातील हवामान तज्ज्ञांनी याबाबत मोठा इशारा दिला. राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी पेरण्याची पूर्ण तयारी केली. मात्र, पाऊस काही येण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच मॉन्सून पूर्णपणे राज्यात दाखल होत नाही, तोपर्यंत पेरण्या न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले. मॉन्सूनची स्थिती पाहता यंदा पाणी टंचाईचे मोठे सावट आहे. शेतकरी चिंतेत आहेत. यासोबतच उष्णताही वाढताना दिसत आहे.

मॉन्सून राज्यात उशिरा दाखल होण्याची शक्यता

अनेक हवामान तज्ज्ञांकडून मोठे इशारे दिले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षाच पाऊस काही पडण्याचे नाव घेत नाही. जर जून महिना जर कोरडा केला तर एक वेगळे मोठे संकट उभे राहू शकते. शेतीच्या पाण्याची समस्या आहे. मॉन्सून राज्यात उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामध्येच कोणत्याही परिस्थितीमध्ये 20 जूनला राज्यात मॉन्सून दाखल होणे आवश्यक आहे. जर मॉन्सून लांबणीवर पडला तर पेरणीचे संकट उभे राहून शकते.

स्थिती बघता 22 जूनपर्यंत राज्यात पाऊस येण्याच अंदाज

सध्या अरबी समुद्रातील मॉन्सूनची स्थिती बघता 22 जूनपर्यंत राज्यात पाऊस येण्याच अंदाज काही हवामान तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. ही एक राज्याकरिता मोठी धोक्याची घंटा आहे. देशातील काही राज्यात मॉन्सून सक्रिय झाल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, राज्यात अजूनही मॉन्सूनच्या पावसाची प्रतिक्षा आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts