Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • रोजगाराची मोठी संधी! पश्चिम बंगालमध्ये 1 लाख सरकारी पदे लवकरच भरणार; जाणून घ्या कोणत्या विभागात किती जागा
ताज्या बातम्या

रोजगाराची मोठी संधी! पश्चिम बंगालमध्ये 1 लाख सरकारी पदे लवकरच भरणार; जाणून घ्या कोणत्या विभागात किती जागा

West Bengal Govt Jobs

West Bengal Govt Jobs: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम बंगालमध्ये लवकरच 1 लाखाहून अधिक सरकारी रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा सोमवारी अधिवेशनात करण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील अनेक तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या विभागात किती पदांची भरती होणार आहे.

पश्चिम बंगालमधील बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. सरकारने विविध विभागांमध्ये तब्बल १ लाख पदे भरण्याची योजना जाहीर केली असून शिक्षक आणि पोलीस विभागात सर्वाधिक भरती होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील रोजगाराच्या संधीमध्ये मोठी वाढ होणार आहे.

राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर करताना या भारतीसंदर्भातील महत्वाची माहिती दिली. शिक्षण, सुरक्षा आणि प्रशासन या प्रमुख क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत.

हेही वाचा: CUET UG 2026 चा निकाल जाहीर; असा चेक करता येणार स्कोअरकार्ड

शिक्षक आणि पोलीस विभागात सर्वाधिक भरती

सरकारी योजनेंतर्गत एकूण १ लाख पदे भरली जाणार असून त्यातील मोठा हिस्सा शिक्षक आणि पोलीस विभागासाठी राखीव आहे.

सुमारे ५० हजार पदे शिक्षकांसाठी
सुमारे २० हजार पदे पोलीस विभागासाठी
बाकीचे उर्वरित पदे इतर विविध सरकारी विभागांमध्ये

या भरतीमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्था आणि कायदा- सुव्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय

सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठीही मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनात महिलांचा सहभाग वाढवण्यास मदत होणार आहे. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मदत केंद्र (Women Help Desk) अधिक सक्षमपणे कार्यान्वित करण्यावर भर दिला जाणार आहे.

कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही अर्थसंकल्पात दिलासा देण्यात आला आहे. महागाई भत्त्यात (DA) 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो 18 टक्क्यांवरून 38 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. याशिवाय, सिव्हिक व्हॉलंटिअर्स, होमगार्ड आणि ग्रीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या मासिक मानधनात 2,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयांमुळे राज्यातील सरकारी कर्मचारी आणि नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts