Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
ताज्या बातम्या

मोठी बातमी! ठाण्यात टीईटी परीक्षा पेपर फुटला; उद्याची परीक्षा रद्द

Maharashtra TET 2026 Paper Leak

Maharashtra TET Paper Leak: भावी शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. 28 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र टीईटी परीक्षेचा पेपर आज २७ जून रोजी ठाण्यात फुटल्याची माहिती पुढे आली आहे.

नीट पेपरफुटीचे प्रकरण अद्याप चर्चेत असतानाच आता महाराष्ट्रात आणखी एका परीक्षेच्या पेपरफुटीची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भावी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी ही मोठी चिंता निर्माण करणारी बाब ठरली आहे. उद्या, 28 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र टीईटी परीक्षेचा पेपर आज, 27 जून रोजी ठाण्यात फुटल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राज्यभरातील उमेदवारांमध्ये संभ्रम, संताप आणि नाराजीचे वातावरण आहे. शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: थिएटरनंतर OTTवर ‘राजा शिवाजी’चा जलवा; कुठे पाहाल हा ब्लॉकबस्टर चित्रपट?

महाराष्ट्र टीईटी परीक्षा

महाराष्ट्र टीईटी परीक्षा राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. मात्र, परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधीच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे प्रश्नपत्रिका फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणाचा पर्दाफाश केला.

भिवंडीत पोलिसांची कारवाई

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका पैशांच्या मोबदल्यात काही उमेदवारांना पुरवली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार २७ जूनच्या पहाटे भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकण्यात आला.

या कारवाईदरम्यान संशयितांकडून काही प्रश्नपत्रिका आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी केल्यानंतर जप्त करण्यात आलेले प्रश्न टीईटी जून २०२६ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

परीक्षेची गोपनीयता आणि पारदर्शकता अबाधित राहावी, यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा तात्काळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सुरक्षा उपायांनंतरही पेपरफुटी

यापूर्वी नीट परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन टीईटी परीक्षेसाठी कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरीही प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार समोर आल्याने परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिक्षकांच्या भविष्यावर परिणाम

टीईटी परीक्षा ही शिक्षक भरती तसेच सेवेत असलेल्या शिक्षकांच्या पात्रतेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले असून, त्यासाठी ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंतची मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलल्याने हजारो उमेदवार आणि सेवेत असलेल्या शिक्षकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, पेपरफुटीमागील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts