Raja Shivaji OTT Release: मराठी चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक आणि विक्रम मोडणारा चित्रपट ‘राजा शिवाजी’ अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. थिएटरमध्ये प्रचंड यश मिळवल्यानंतर आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. चला तर जाणून घेऊया हा चित्रपट कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
रितेश देशमुख दिग्दर्शक आणि मुख्य भूमिकेत असलेला “राजा शिवाजी” हा चित्रपट १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनानंतर तब्बल ५७ दिवसांनी या चित्रपटाने ओटीटीवर पदार्पण केले आहे.
कुठे पाहता येणार “राजा शिवाजी”?
हा चित्रपट आता Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या ऐतिहासिक प्रवास अनुभवण्याची संधी मिळणार आहे. (Latest Marathi Movies Release)
https://www.instagram.com/p/DaCZemdKTuk/?utm_source=ig_embed&ig_rid=AAEtjeZghz4cMGPsXa5js9J
बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी
सुमारे ७५ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३० कोटींहून अधिक कमाई करत मोठा विक्रम केला. यामुळे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. याआधीचा विक्रम हा सैराट चित्रपटाच्या नावावर होता, तोही या चित्रपटाने मोडला. तसेच, परदेशात १०० कोटींचा टप्पा पार करणारा पहिला मराठी चित्रपट म्हणूनही याची नोंद झाली आहे. (Latest Marathi News)
ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील सुरुवातीचा काळ, स्वराज्य स्थापनेचा प्रवास आणि अफजल खान प्रकरणापर्यंतचा इतिहास प्रभावीपणे मांडतो. (LS Marathi News Channel)
स्टारकास्टची नावे
या चित्रपटात रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर जेनेलिया देशमुख यांनी राणी सईबाईंची भूमिका साकारली आहे. याशिवाय संजय दत्त (अफझल खान), अभिषेक बच्चन, भाग्यश्री, विद्या बालन, फरदीन खान, सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. सलमान खानचा विशेष कॅमिओही प्रेक्षकांचे लक्ष वेधतो.
थिएटरमध्ये जबरदस्त यश मिळवल्यानंतर आता हा चित्रपट OTTवरही तितकाच प्रभाव पाडतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.












