Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जुलैमध्ये मनोरंजनाचा महासंग्राम! एकाच महिन्यात 5 चित्रपटांची एन्ट्री होणार; कोणता ठरणार बॉक्स ऑफिसचा बादशाह?
मनोरंजन

जुलैमध्ये मनोरंजनाचा महासंग्राम! एकाच महिन्यात 5 चित्रपटांची एन्ट्री होणार; कोणता ठरणार बॉक्स ऑफिसचा बादशाह?

July 2026 Movies Releases

July 2026 Movies Releases: चित्रपटप्रेमींसाठी जुलै महिना खास ठरणार आहे. एकापाठोपाठ एक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार असून बॉक्स ऑफिसवर तगडी स्पर्धा रंगण्याची चिन्हे आहेत. चला तर जाणून घेऊया, या महिन्यात कोणते बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

चित्रपटप्रेमींसाठी जुलै २०२६ हा महिना खास ठरणार आहे. या महिन्यात विविध विषय, भव्य निर्माती आणि स्टारकास्टने सजलेले अनेक मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पैराणिक कथा, ॲक्शन थ्रिलर, सुपरहिरो, अॅडव्हेंचर, सामाजिक आशय आणि कौटुंबिक विनोद अशा विविध शैलीतील चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिसवर चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. चला जाणून घेऊया जुलैमधील चर्चेतील पाच महत्वाच्या चित्रपटांविषयी.

हेही वाचा: अणु संशोधन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी! JRF पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

‘नागबंधम’

हा चित्रपट नागबंधम ३ जुलै २०२६ रोजी रिलीज होणार आहे. पौराणिक रहस्य, फँटसी आणि साहस यांची मेजवानी असलेला ‘नागबंधम’ हा पॅन-इंडिया चित्रपट जुलैमधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अभिषेक नामा दिग्दर्शित या चित्रपटात विराट कर्णा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘अल्फा’

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील पहिला महिला-केंद्रित चित्रपट ‘अल्फा’ प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी रिलीज होणार आहे. यात आलिया भट्ट आणि शरवरी मुख्य भूमिकांमध्ये दिसणार असून त्यांच्यासोबत बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ॲक्शन, गुप्तहेरगिरी आणि थराराचा संगम असलेला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर वेगळा अनुभव देण्यास सज्ज आहे.

धमाल 4′

लोकप्रिय ‘धमाल’ मालिकेचा चौथा भाग पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी तयार आहे. हा चित्रपट १० जुलै २०२६ पासून सर्व चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. अजय देवगण, रितेश देशमुख, अरशद वारसी, जावेद जाफरी आणि संजय मिश्रा यांची टीम यावेळीही विनोदाचा धमाका करताना दिसणार आहे. कौटुंबिक मनोरंजन आणि हलक्याफुलक्या कथानकामुळे हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करू शकतो.

‘द इंडिया स्टोरी’

‘द इंडिया स्टोरी’ मुव्ही २४ जुलै २०२६ रिलीज होणार आहे. समाजातील अन्नभेसळीच्या वाढत्या समस्येवर भाष्य करणारा ‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट कोर्टरूम ड्रामा आणि सामाजिक कथानकाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा विषय मांडणार आहे. दिग्दर्शक चेतन डीके यांच्या या चित्रपटात काजल अग्रवाल, श्रेयस तळपदे, मुरली शर्मा आणि मनीष वाधवा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट सामाजिक संदेशासोबत मनोरंजनाचाही अनुभव देणार आहे.

‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’

31 जुलै 2026 रोजी ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ प्रदर्शित होणार आहे. मार्व्हलच्या लोकप्रिय सुपरहिरोची कथा नव्या अध्यायासह प्रेक्षकांसमोर येणार आहे. दमदार ॲक्शन, आधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्स आणि रोमांचक कथानकामुळे ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ हा जुलैमधील सर्वात चर्चित हॉलीवूड चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. जगभरातील चाहत्यांप्रमाणे भारतीय प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता आहे.

बॉक्स ऑफिसवर रंगणार खरी स्पर्धा

मोठे कलाकार, भव्य निर्मिती आणि विविध शैलीतील कथानकांमुळे जुलै 2026 हा महिना चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सामाजिक विषयांपासून सुपरहिरो विश्वापर्यंत आणि विनोदी मनोरंजनापासून पौराणिक साहसापर्यंत प्रत्येक प्रेक्षकासाठी काहीतरी खास या महिन्यात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या पाच चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts