Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • अणु संशोधन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी! JRF पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Top News

अणु संशोधन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी! JRF पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

IGCAR JRF Recruitment 2026

IGCAR JRF Recruitment 2026: इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्र (IGCAR), कल्पक्कम यांनी कनिष्ठ संशोधन फेलो या ५० हुन अधिक रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भौतिकशास्त्र, रसायनशाश्स्त्र, पदार्थ विज्ञान, विकिरण भौतिकी तसेच विविध अभियांत्रिकी शाखांतील पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.

ही भरती केवळ भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २२ जून २०२६ पासून सुरू झाली असून उमेदवार १३ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया IGCAR च्या अधिकृत संकेतस्थळावरून पूर्ण करता येईल.

हेही वाचा: “मी बोललो तर सनद जाईल…” राहुल नार्वेकरांवर असीम सरोदे यांचा घणाघाती टोला

पात्रता

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता विषयानुसार वेगळी ठेवण्यात आली आहे. विज्ञान शाखेतील पदांसाठी संबंधित विषयात एमएससी किंवा इंटिग्रेटेड एमएससी पदवी आवश्यक आहे. काही पदांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचे पदवी स्तरावरील ज्ञानही अपेक्षित आहे.

अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांकडे संबंधित विषयात बीई,बीटेक,एमई किंवा एमटेक पदवी असणे गरजेचे आहे. काही पदांसाठी GATE स्कोअर अनिवार्य असून काही उमेदवारांना त्यांच्या कामगिरीनुसार थेट मुलाखतीसाठी बोलवले जाऊ शकते.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त २८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. मात्र सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गतील उमेदवारांना वयोमर्यादा सवलत मिळेल.

फेलोशिप आणि सुविधा

निवड झालेल्या उमेदवारांना होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट (HBNI) अंतर्गत पीएचडी कार्यक्रमात प्रवेश दिला जाईल. संशोधनादरम्यान त्यांना दरमहा २५००० ते ४२००० रुपये इतकी फेलोशिप मिळेल. ज्यामुळे आर्थिक मदतीसह संशोधनाची संधी उपलब्ध होईल.

आवश्यक कागदपत्रे

अर्ज प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी जन्मतारीख प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका (१० वीपासून पुढे) अनुभव प्रमाणपत्र (असल्यास), जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, NOC तसेच GATE/UGC-CSIR NET/JEST स्कोअर कार्ड तयार ठेवणे आवश्यक आहे. सर्व मूळ कागदपत्रांसह स्वयं- साक्षांकित प्रतीही अपलोड कराव्या लागतील. (LS Marathi News)

अर्ज प्रक्रिया

उमेदवारांनी IGCAR च्या अधिकृत वेबसाइट https://www.igcar.gov.in/ ला भेट देऊन “JRF Recruitment 2026” या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर नवीन नोंदणी करून आवश्यक माहिती भरावी. लॉगिन केल्यानंतर अर्ज फॉर्म पूर्णपणे भरून फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. सर्व माहिती तपासून अंतिम सबमिशन करणे आवश्यक आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts