Rahul Narwekar Marathi Controversy: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव वाचताना केलेल्या मराठी उच्चारांच्या चुकांवरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत असून अनेक स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
या प्रकरणावर विधितज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी उपरोधिक शैलीत प्रतिक्रिया देत नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अप्रत्यक्ष टोला लगावत म्हटले की, “काहीही झाले तरी ती यावर बोलणार नाही, नाहीतर माझी वकिलीची सनद पुन्हा धोक्यात येईल.” या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
सरोज यांची टीका
सरोज यांनी पुढेही टीका करताना असे मत व्यक्त केले की, सत्ताधारी पदावर असलेल्या व्यक्तींकडून कायदा, संविधान आणि भाषेचा सन्मान राखला जाणे अपेक्षित असते. मात्र काहीवेळा याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सभागृहात नंतर इतरांना शिस्त आणि नियमांचे धडे दिले जातात,यावरही त्यांनी उपरोधित टिप्पणी केली.
शब्दांचे उच्चार चुकीचे
या वादाची सुरुवात विधानसभेत सादर करण्यात आलेल्या शोकप्रस्तावापासून झाली. प्रसिद्ध गायिका अशा भोसले यांच्या निधनानंतरचा हा प्रस्ताव वाचताना राहुल नार्वेकर यांनी अनेक शब्दांचे उच्चार चुकीचे केल्याचे समोर आले. काही ठिकाणी शब्दांचा अर्थ बदलणारे उच्चार झाले, तर काही नावांनेही चुकीचे उल्लेख झाले.
या प्रकारानंतर “मूळ मजकूर चुकीचा होता की वाचनात त्रुटी झाली?” असा प्रश्नही चर्चेत आला आहे. काही राजकीय वर्तुळात यामागे चुकीची स्क्रिप्ट दिली गेली का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
राज ठाकरे यांनीही तीव्र प्रतिक्रिया
दरम्यान, या घटनेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सभागृहातील प्रकारावर नाराजी व्यक्त करत, मराठी भाषेच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, विधानसभेत मराठी मजकूर योग्य प्रकारे वाचला न जाणे ही चिंतेची बाब आहे.
सुप्रिया सुळे
तसेच मराठी येत नसेल तर क्लास लावावा असेच सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर मराठी भाषेचा सन्मान, विधिमंडळातील कार्यपद्धती आणि जबाबदारी यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.










