Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • विलास घुले हत्या प्रकरणाला नवे वळण; खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाचे नाव चर्चेत, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
राजकारण

विलास घुले हत्या प्रकरणाला नवे वळण; खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाचे नाव चर्चेत, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

Beed Vilas Ghule Murder Case

Beed Vilas Ghule Murder Case: बीड जिल्हात गेली काही दिवसापासून गुन्हेगारी वाढली असून विलास घाले हत्याकांडाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाचे नाव चर्चेत असल्याने तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल मालक विलास घुले यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या घुले यांची हत्या झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात काही आरोप-प्रत्यारोप होत असून, तपासात खासदार बजरंग सोनवणे यांच्या कुटुंबातील सौरभ सोनवणे यांचे नाव जबाबात नोंदवले गेल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: केतनचा मृतदेह घरी आणताच खटकली ‘ही’ बाब; वडिलांच्या खुलाशाने वाढलं गूढ, नेमकं काय घडलं?

नातेवाईकांकडून मागणी

या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात यावी आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नातेवाईक आक्रमक असून त्यांनी पोलिस ठाण्यासमोर आंदोलनही केले. या वेळी विलास घुले यांचा मृतदेह पोलिस ठाण्याबाहेर आणून ठेवण्यात आल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली.

काही व्यक्तींची नावे चर्चेत

या प्रकरणात स्थानिक पातळीवर काही व्यक्तींची नावे चर्चेत आली असून तपासादरम्यान त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. घटनेमागील नेमके कारण काय, कोणाचा सहभाग आहे आणि हत्येपूर्वी काय घडले, याचा सखोल तपास सुरू आहे.

राजकीय आणि सामाजिक स्तरावरही चर्चा

दरम्यान, या प्रकरणावरून परिसरात राजकीय आणि सामाजिक स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे निष्पक्ष आणि जलद तपासाची मागणी केली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाचे लक्ष असून पोलिसांकडून सर्व पुरावे, व्हिडिओ फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब तपासले जात आहेत. पुढील तपासानंतरच प्रकरणातील सत्य समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट फोन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. केज पोलीस ठाण्याबाहेर विलास घुले यांचा मृतदेह सुमारे 9 तास ठेवण्यात आला होता. त्यानंतर रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले.

या प्रकरणात आरोपींना अटक करण्याची मागणी अधिवेशनातही उपस्थित करण्यात आली. आमदार धनंजय मुंडे आणि नमिता मुंदडा यांनी हा मुद्दा मांडत योग्य तपास आणि कारवाईची मागणी केली.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts