Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • नसरापूर प्रकरणातील आरोपी दोषी; शिक्षेचा निकाल २९ जूनला, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Top News

नसरापूर प्रकरणातील आरोपी दोषी; शिक्षेचा निकाल २९ जूनला, न्यायालयात नेमकं काय घडलं?

Nasrapur Case Verdict

Nasrapur Case:

Nasrapur Case Verdict: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला दोषी ठरवले आहे. या अत्यंत संवेदनशील आणि राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या प्रकरणात आता सर्वांचे लक्ष २९ जून रोजी होणाऱ्या शिक्षेच्या निकालाकडे लागले आहे.

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी गुरुवारी 25 जूनला निकाल देताना आरोपीविरुद्धचे सर्व महत्त्वाचे आरोप सिद्ध झाल्याचे नमूद केले. यानंतर शिक्षेवर सुनावणी सुरू करण्यापूर्वी न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला बोलावून त्याची बाजू ऐकून घेतली.

यावेळी न्यायाधीशांनी घटनेच्या वेळी नेमके काय घडले होते, अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने मुलगी पाय घसरून पडली होती आणि आपण तिला उचलून खाटेवर नेण्याचा प्रयत्न करत होतो, असा दावा केला. मात्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवत आरोपीने यापूर्वी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबातीलच गोष्टी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा: आषाढी यात्रेला प्रारंभ! मुसळधार पावसातही भक्तीचा जल्लोष; मुक्ताई पालखी पंढरपूरकडे रवाना

सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपीला, “तो प्रसंग आठव आणि तूच सांग, तुला कोणती शिक्षा द्यावी?” असा सवाल केला. मात्र यानंतर आरोपीकडे कोणतेही ठोस उत्तर नव्हते. न्यायालयातील या घडामोडींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान, पीडित मुलीचे आई-वडीलही न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी न्यायालयासमोर भावनिक भूमिका मांडत या प्रकरणातून समाजात कठोर संदेश जाणे आवश्यक असल्याचे सांगितले. अशा अमानुष कृत्यांना आळा बसण्यासाठी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा सुनावावी, अशी मागणी त्यांनी केली.

Nasrapur Case :

नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपी दोषी; विशेष न्यायालयाचा नेमका काय निकाल?

या प्रकरणात विविध गंभीर कलमांखाली खटला चालवण्यात आला होता. न्यायालयाने सर्व पुरावे, साक्षीदारांचे जबाब, डीएनए अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले आहे. काही कलमांमध्ये मृत्युदंडाची तरतूद असून, आता शिक्षेबाबतचा अंतिम निर्णय २९ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालय कोणती शिक्षा सुनावते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Nasrapur Case :

सुनावणीचा घटनाक्रम

१ मे : घटना घडली, आरोपी ताब्यात
७ मे : आरोपीची घटनास्थळी नेऊन तपासणी
१४ मे : न्यायालयीन कोठडी
१६ मे : दोषारोपपत्र दाखल
२८ मे : आरोप निश्चित
जून महिन्यात साक्षी-पुरावे नोंदवण्यास सुरुवात
१७ जून : महत्त्वाचे पुरावे सादर
२० जून : अंतिम युक्तिवाद पूर्ण
२५ जून : आरोपी दोषी
२९ जून : निकाल अपेक्षित

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts