Pune Firing Incident: पुण्यासाठी फ़ुरसंगी परिसरात व्यावसायिकाच्या कार्यालयाबाहेर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. खंडणीसाठी धमकी देत हा हल्ला झाल्याचा आरोप असून प्राथमिक तपासात या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित नावांचा उल्लेख समोर आला आहे.
पुण्यासाठी फ़ुरसंगी भागात व्यावसायिकाच्या कार्यालयातबाहेर गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हडपसर- सासवड रस्त्यावरील या घटनेत खंडणीसाठी दबाव टाकून गोळीबार करण्यात आल्याचा आरोप असून, प्राथमिक तपासात या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित नावांचा उल्लेख झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: शिंदे गटावर संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल; ‘पैसा फेको, तमाशा देखो’ म्हणत गंभीर आरोप
मोबाइलवरून खंडणीची मागणी
तक्रारदार व्यावसायिकाचे फुरसुंगी परिसरात पाईप आणि पोलाद विक्रीचे गोदाम व कार्यालय आहे. फिर्यादीनुसार, सोमवारी दुपारी त्यांच्या मोबाईलवर “अर्जुन बिष्णोई” नाव सांगणाऱ्या व्यक्तीने संपर्क साधला. आणि संबंधिताने स्वतःला बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगत खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. (Latest Crime News)
घटनेनंतर घाबरलेल्या व्यावसायिकाने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पुढील तपासासाठी प्रकरण फुरसुंगी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. (Pune Firing Incident)
कार्यालयावर गोळीबार
तक्रारीनंतर काही तासांतच रात्री सुमारे सव्वाआठच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी व्यावसायिकाच्या कार्यालयाच्या दरवाज्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. अंदाजे चार गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून सासवड रोडच्या दिशेने पसार झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी केली आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. (Latest Pune Marathi News)
फर्निचर व्यावसायिकावर गोळीबार
अलीकडेच पिंपरी-चिंचवडमधील रावेत भागातही फर्निचर व्यावसायिकावर गोळीबार झाला होता. त्या प्रकरणातही खंडणीसाठी धमकावल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर पुणे परिसरात अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत तपास वेगाने सुरू असल्याचे सांगितले आहे. (LS Marathi News Channel)












