Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकरणाची जबाबदारी स्वीकारताच त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात राज्य सरकारने जेष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम Appointed Special Public Prosecutor Ujjwal Nikam यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्यासाठी सरकारने ही भूमिका निश्चित केली आहे.
पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल (Ketan Agarwal Case) यांच्या मृत्यूनंतर उघडकीस आलेल्या हत्या प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात केटांचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांची घेऊन दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली. तसेच, या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी विनंतीही त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी ही मागणी तत्काळ मान्य केली. त्यानंतर उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी विशेष सरकारी वकील म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास सहमती दर्शवली.
तपासणी गुणवत्ता सर्वात महत्वाची
नियुक्तीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत संवेशनशील आणि आव्हानात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून या प्रकरणाची माहिती दिली आणि अग्रवाल कुटूंबीयांची अपेक्षा सांगितली.
लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली.
या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी… pic.twitter.com/JGAsQVCOvd— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 26, 2026
या प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास हा न्यायालयीन प्रक्रियेत निर्णयाक ठरणार असून, उपलब्ध पुरावे आणि कायदेशीर प्रक्रियेच्या आधारे प्रकरणाच्या शेवटपर्यत पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (LS Marathi News Channel)
प्रकरण नेमके काय?
पोलिस तपासानुसार, केतन अग्रवाल यांना ट्रेकिंगच्या निमित्ताने लोहगड किल्ल्यावर बोलावण्यात आले. तपास यंत्रणांचा दावा आहे की, यापूर्वीही अशाच प्रकारचा कट रचण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र तो यशस्वी झाला नव्हता. त्यानंतर पुन्हा नियोजन करून केतन यांना लोहगडावर नेण्यात आले.
तपासात समोर आलेल्या आरोपांनुसार, पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून तेथे आधीपासून उपस्थित असलेल्या संशयिताच्या मदतीने केतन यांना दरीत ढकलण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून, अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.









