Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत असताना आता आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. पोलिस कोठडीत असताना आरोपी सिया गोयल हिने दिलेल्या कथित जबाबातून या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाल्याची चर्चा आहे.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत असताना आता आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकअपमध्ये चौकशीदरम्यान सियाने केतनसोबत लग्न न करण्यामागचे कारण सांगितल्याचे समोर आले आहे. तिच्या म्हणण्यानुसार, केतन हा टक्कला होता. आणि तो पॅच लावत होता. त्यामुळे मला लग्न करायचे नव्हते. असा दावा केला जात आहे.
सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना अटक
या प्रकरणात यापूर्वीच सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. केतनचा मृतदेह लोहगड किल्ला परिसरातील दरीत आढळल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले होते. तपासात दोघांनी मिळून पूर्वनियोजित कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पोलिस तपासात डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड्स आणि घटनास्थळावरील माहितीच्या आधारे या प्रकरणाची उकल केली जात आहे. आरोपींच्या हालचाली आणि संवाद यावरून हा प्रकार अपघात नसून घातपात असल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत
सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून आणखी महत्त्वाचे खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.
केतन अग्रवाल प्रकरणातील हा नवा दावा सध्या चर्चेचा विषय ठरला असून पुढील तपासातून सत्य समोर येण्याची प्रतीक्षा आहे.












