Nasarapur Case Verdict Explainer: नसरापूर अत्याचार प्रकरणाकडे (Nasarapur Case Verdict Explainer) अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. आरोपी भीमराव कांबळेला कोर्ट काय शिक्षा देणार असा प्रश्न निर्माण झाला होता. पण कोर्टाने अखेर आज आरोपीला शिक्षा सुनावली आहे. आरोपीने साडेतीन वर्षाच्या चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडत अद्याचार केला होता..त्यानंतर आरोपीने चिमुकलीची हत्या करत मृतदेह शेणाऱ्या ढिगाऱ्याखाली लपवला होता. कांबळेने हा गंभीर गुन्हा केल्यानंतरही त्याला कोणताही पश्चाताप नव्हता. गुन्हा गंभीर असल्याने आणि आरोपीला कोणताही पश्चाताप नसल्याने कोर्टाने थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे…कोर्टाने निकाल जाहीर करण्यापूर्वी कोणत्या कोणत्या प्रकरणाचा दाखला दिला? कोर्टाने किती वर्षानंतर पुन्हा फाशीची शिक्षा सुनावली आहे? आरोपीला कशी फाशीची शिक्षा महत्त्वाची होती? एवढ्या कमी कालावधीत कोर्टाने कशी फाशीची शिक्षा सुनावलीये?
हेही वाचा: घुलेच्या मित्राने केला अत्याचार अन् विलासने शिवीगाळ करत ‘संबंध न ठेवल्यास…’ महिलेचा खळबळजनक दावा
काय आहे घटना
पुण्याच्या नसरापुरात 1 मेच्या संध्याकाळी साडेतीन वर्षांची पीडित मुलगी बेपत्ता झाली आणि काही वेळातच तिचा मृतदेह आढळून आला. 2 मे रोजी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे भीमराव कांबळेला अटक केली. महाराष्ट्र दिनाच्याच दिवशी घडलेल्या या क्रूर घटनेनंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती..चिमुकलीच्या कुटुंबाने आणि लोकांनी पुण्यात विविध ठिकाणी आंदोलने केली..नागरिकांनी पुण्यातील नवले पूल रोखून धरले होते..या संवेदनशील खटल्याप्रकरणी आज शिक्षा सुनावण्यात आली… या संवेदनशील प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आज आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवत थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयात ठोस पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा वेग..1 मे रोजी ही अमानुष घटना घडली आणि 2 मे रोजी पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला बेड्या ठोकल्या. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत न्यायालयात ठोस पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले.. परिणामी, गुन्हा घडल्यापासून अवघ्या 60 दिवसाच्या आत तपास, साक्षी-पुरावे आणि अंतिम सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने १३७ पानांचा ऐतिहासिक निकाल दिला… महाराष्ट्राच्या कायदेशीर इतिहासात अत्याचार आणि हत्या प्रकरणातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी हा एक ठरला आहे. (Nasarapur Case Verdict Explainer)
दोन ऐतिहासिक प्रकरणांचा दाखला
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या कोर्टात जेव्हा अंतिम सुनावणी सुरू झाली, तेव्हा दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद केला… बचाव पक्षाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या १२ महत्त्वाच्या निर्णयांचा दाखला दिला, तर सरकारी पक्षानेही आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या १२ खटल्यांचे संदर्भ कोर्टासमोर ठेवले. न्यायालयाने निकाल देताना प्रामुख्याने खालील दोन ऐतिहासिक प्रकरणांचा दाखला दिला
वसंत धुपारे विरुद्ध महाराष्ट्र राज्य’ या प्रकरणाचा दाखला दिला. या प्रकरणात 4 वर्षीय मुलीवरील अत्याचारानंतर आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सरकारी वकील विपुल दुशिंग यांनी हा दाखला देत भीमराव कांबळेलाही फाशी देण्याची मागणी लावून धरली.
‘बच्चन सिंग विरुद्ध पंजाब राज्य’ खटला.. सर्वोच्च न्यायालयाचा हा एक ऐतिहासिक निर्णय आहे, ज्यामध्ये ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळचा सिद्धांत मांडण्यात आला… याच सिद्धांताचा आधार घेत कोर्टाने नमूद केले की, ६५ वर्षांच्या नराधमाने साडेतीन वर्षांच्या मुलीसोबत केलेले कृत्य हे अमानवीय आणि क्रूरतेची पराकाष्ठा करणारे होते… (Nasarapur Case Verdict Explainer)
न्यायालयाने स्पष्ट केले की, मृत्युदंडाचा निर्णय हा वैयक्तिक मत किंवा पूर्वग्रहावर आधारित नसून, तो पूर्णपणे भारतीय संविधान आणि भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसारच दिला जात आहे… शिक्षेची तीव्रता ठरवताना कोर्टाने आरोपीचे वय, त्याची मानसिक स्थिती आणि गुन्ह्याचे स्वरूप तपासले.
भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नव्हता
कोर्टाने अत्यंत कडक शब्दांत निरीक्षण नोंदवले की, “हा गुन्हा अत्यंत नियोजित , मानसिक आणि शारीरिक क्रूरता दाखवून केलेला आहे… गुन्ह्याचा समाजावर झालेला परिणाम लक्षात घेता, जितका गंभीर गुन्हा, तितकीच कठोर शिक्षा मिळणे गरजेचे आहे.” सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एवढा भयानक गुन्हा केल्यानंतरही आरोपी भीमराव कांबळेच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात कोणताही पश्चाताप दिसून आला नाही. त्याच्या बाजूने कोणतीही विशेष सूट देणारी परिस्थिती नसल्याने, न्यायालयाने त्याला फाशीसाठी योग्य पात्र ठरवले.
आरोपीला फाशीची शिक्षा का महत्त्वाची होती?
समाजात वाढत्या विकृतीला आळा घालण्यासाठी आणि कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी भीमराव कांबळेला फाशी मिळणे अत्यंत गरजेचे होते. ६५ वर्षे वय असूनही त्याने दाखवलेली क्रूरता ही संपूर्ण मानवजातीला कलंकित करणारी होती. जर अशा नराधमांना वयाचा किंवा इतर कायदेशीर पळवाटांचा फायदा मिळाला असता, तर समाजाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला असता…इतर आरोपींनी असं कृत्य केलं असतं… अवघ्या ६० दिवसांत लागलेल्या या निकालामुळे समाजात एक मोठा संदेश गेला आहे की, अशा क्रूर कृत्यांची गय केली जाणार नाही आणि नराधमांना थेट फासावरच चढवले जाईल…(LS Marathi News Channel)
पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
या प्रकरणाच्या निमित्ताने अनेकांच्या मनात प्रश्न होता की, पुणे कोर्टाने यापूर्वी अशा गुन्ह्यात कधी फाशी सुनावली होती? तर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने तब्बल 9 वर्षांपूर्वी, म्हणजेच २०१७ रोजी पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या प्रसिद्ध ‘नयना पुजारी सामूहिक बलात्कार आणि हत्या’ प्रकरणात तीन मुख्य आरोपींना एकाच वेळी फाशीची कडक शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज, ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा पुण्याच्या याच विशेष न्यायालयाने नसरापूरच्या चिमुकलीवरील अत्याचाराचे गांभीर्य पाहून नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत कायद्याचा जरब दाखवून दिला आहे. (Nasarapur Case Verdict Explainer)
नसरापूर प्रकरणातील जलद न्यायनिवाड्यामुळे पीडित चिमुकलीच्या आत्म्याला आणि तिच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मात्र, अशा घटना भविष्यात घडू नयेत म्हणून समाजात जनजागृती आणि कायद्याची कडक अंमलबजावणी होणे हीच काळाची गरज आहे.







